RBI Governor: बँकांमधून पैसे होतायत कमी; आरबीआयने व्यक्त केली चिंता, सांगितले मोठे कारण...

Deposit Growth: बँकांमधील ठेवींची वाढ काही काळापासून कमी होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही याबाबत इशारा दिला आहे. अलीकडेच देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीनेही कर्जाऐवजी बचतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
RBI Governor
RBISakal
Updated on

Bank Deposit Growth: बँकांमधील ठेवींची वाढ काही काळापासून कमी होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही याबाबत इशारा दिला आहे. अलीकडेच देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीनेही कर्जाऐवजी बचतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, ठेवींची वाढ ही काही काळापासून कर्ज वाढीच्या मागे आहे. यामुळे बँकांच्या संरचनात्मक तरलतेचा प्रश्न समोर येऊ शकतो. ग्राहकांनी बँक ठेवी आणि इतर गुंतवणुकीऐवजी म्युच्युअल फंडांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे हा बदल झाल्याचेही दास म्हणाले.

पूर्वी बहुतेक लोक फक्त बँकांमध्येच पैसे ठेवत असत. पण आता ते आपली बचत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत आहेत. म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि पेन्शन फंड या स्वरूपात गुंतवणुकीचे पर्याय पूर्वीच्या तुलनेत वाढले आहेत. त्यामुळे बँकांकडे असलेल्या ठेवींमध्ये सातत्याने घट होत असल्याने अडचणी येत आहेत.

RBI Governor
Budget 2024: कॅप्टन निर्मला सीतारामन यांच्या टीमचे 6 चेहरे कोण आहेत? ज्यांनी तयार केले 2024 बजेट

रोखीचे व्यवस्थापन करण्यातही अडचण

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान शक्तीकांता दास यांनी चिंता व्यक्त केली की, बँकांमधील ठेवी पाहिजे तितक्या वेगाने वाढत नाहीत. ते म्हणाले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, बँक कर्जामध्ये 14% वाढीच्या तुलनेत, बँक ठेवी केवळ 10.6% दराने वाढल्या आहेत.

चढ-उतार हाताळण्यासाठी यंत्रणा आवश्यक

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटामुळे हे उघड झाले आहे की बँकांना तरलता व्यवस्थापित करण्यासाठी आणि व्याजदरातील चढउतार हाताळण्यासाठी मजबूत यंत्रणांची आवश्यकता आहे.

त्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकांसाठी लिक्विडिटी कव्हरेज रेशो नियमांवर पुनर्विचार करत आहे जेणेकरून कोणतीही समस्या टाळता येईल. डिजिटल व्यवहार वाढल्याने बँकांनाही सायबर सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल, असेही दास म्हणाले.

RBI Governor
Budget 2024: अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते निर्णय घेतले जाणार? सर्वसामान्यांवर होणार मोठा परिणाम

ते म्हणाले, ऑनलाइन फसवणूक झपाट्याने वाढत आहे. फसवणूक करणारे 'म्युल बँक खाते' मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. ही अशी खाती आहेत जी फसवणूकदार उघडतात आणि नंतर फसवणूक करून कमावलेले पैसे त्यात जमा करतात.

हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीच्या संमतीने किंवा त्याशिवाय होऊ शकते. दास म्हणतात की अशा खात्यांमुळे बँकांचे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय त्यांच्या कामकाजात समस्या निर्माण होतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.