RBI Governor Shaktikanta Das: स्वस्त होम लोन आणि कार लोनची वाट पाहणाऱ्यांची मोठी निराशा होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 18 ऑक्टोबर रोजी व्याजदर कपातीबाबत मोठे विधान केले आहे.
ते म्हणाले की, आता व्याजदर कमी करणे हे अत्यंत धोकादायक असेल. त्यामुळे डिसेंबरमध्ये रेपो दरात कपात होण्याची आशा नाही. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने आपल्या पतधोरणात रेपो दर कमी केला नाही.