RBI Penalty: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; सरकारी बँकेला ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड, तुमच्या पैशांचे काय होणार?

RBI Imposes Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सोनाली बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर सोनाली बँकेला 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI Penalty
RBI PenaltySakal
Updated on

RBI Imposes Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सोनाली बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर सोनाली बँकेला 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आर्थिक नियमांचे पालन न केल्यामुळे या दोन बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे.

RBI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 मार्च 2022 पर्यंतच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मूल्यांकनाची (ISE 2022) तपासणी करण्यात आली. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती, ज्यामध्ये नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकेला आर्थिक दंड का लावला जाऊ नये हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. मात्र, बँकेच्या प्रतिसादावर आरबीआय समाधानी नाही.

RBI Penalty
IT Sector: आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट! मोठ्या कंपन्यांमध्ये 10,000 फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतीक्षेत

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सबसिडी म्हणून सरकारकडून मिळालेल्या निधीच्या बदल्यात कॉर्पोरेशनला कर्ज दिले होते. अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या काही प्रकरणांमध्ये समाविष्ट असलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यांमध्ये निर्धारित वेळेत जमा झाली नाही.

सोनाली बँकेला 96.4 लाख दंड

आणखी एका निवेदनात, सेंट्रल बँकेने म्हटले आहे की त्यांनी सोनाली बँक पीएलसीला KYC सूचना, 2016 सह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये, नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

RBI Penalty
Union Budget 2024: मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

देशातील कोणत्याही बँकेने नियमांचे उल्लंघन केल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेवर कारवाई करते. संबंधित बँकेवर दंड आकारला जातो. पण बँकेवर आकारलेला दंड खातेदारांना भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.