RBI Imposes Fine: आरबीआयने आणखी दोन बँकांवर कडक कारवाई केली आहे. RBI ने युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि 51 (1) सह कलम 47 A (1) (c) च्या तरतुदींनुसार हा दंड ठोठावला आहे. बँकेने काही सूचनांचे पालन न केल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीएल बँक आणि बजाज फायनान्स लिमिटेडवरही दंड ठोठावला आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
(RBI Imposes Fines On Union Bank of India, RBL Bank, Bajaj Finance For Non-Compliance of Rules)
खासगी बँकेला 64 लाखांचा दंड
दुसर्या आदेशात, मध्यवर्ती बँकेने मार्गदर्शक तत्त्वे, 2015 चे पालन न केल्याबद्दल खाजगी क्षेत्रातील RBL बँक लिमिटेडला 64 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बजाज फायनान्सवरही कारवाई
मध्यवर्ती बँकेने आणखी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'NBFCs मधील फसवणुकीवर देखरेख ठेवण्याशी संबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बजाज फायनान्स लिमिटेडला 8.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या 15 दिवसांच्या घडामोडींवर नजर टाकली तर आरबीआयने एसबीआय आणि इंडियन बँकेसह 19 बँकांवर दंड ठोठावला आहे.
इतकेच नाही तर या कालावधीत अहमदाबादस्थित कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना जास्तीत जास्त 50,000 रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. म्हणजेच या बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.