RBI Imposes Penalty: SBIनंतर RBI ची मोठी कारवाई, 'या' 3 बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Imposes Penalty: RBI ने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.
 RBI
RBISakal
Updated on

RBI Imposes Penalty:

RBI ने काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील तीन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या SBI बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर, RBI ने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.

यावेळी आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड यांना दंड ठोठावला आहे.

सारस्वत सहकारी बँकेला 23 लाखांचा दंड

बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, मुंबईला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आरबीआयकडून सांगण्यात आले की सारस्वत सहकारी बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे.

 RBI
Mumbai News : एसटी बँकेला रिझव्हॅ बॅकेंचा दणका ;बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत ठोकला एक लाखांचा दंड

'या' दोन बँकांनाही दंड ठोठावला

याशिवाय, कलम 20 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल वसई, महाराष्ट्रातील बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 25 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बेसिन कॅथोलिक सहकारी बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली आहे.

रिझर्व्ह बँकेने 'ठेवीवरील व्याज दर' यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड, राजकोटला 13 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 RBI
Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणुकीची सुवर्णसंधी, 'या' शेअर्समध्ये करा गुंतवणूक

काही दिवसांपूर्वीच आरबीआयने एसबीआय आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने सांगितले की, एसबीआयला 1.3 कोटी रुपये, इंडियन बँकेला 1.62 कोटी रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

रिझर्व्ह बँक वेळोवेळी नियमांचे पालन न केल्यामुळे बँकांवर दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर कोणतेही निर्बंध येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()