RBI: आरबीआयची मोठी कारवाई! 'या' बँकेतून मिळणार नाही कर्ज; खात्यातून फक्त 15,000 काढता येणार

Reserve Bank restrictions on Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी 15,000 रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे.
Reserve Bank restrictions on Bank
Reserve Bank restrictions on BankSakal
Updated on

Reserve Bank restrictions on Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेची ढासळती आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी 15,000 रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. या अंतर्गत, पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम केवळ ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळण्यास पात्र असेल.

सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेवरील बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत निर्बंध घातले आहेत. आता, सर्वोदय सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही कर्ज आणि ॲडव्हान्स देऊ किंवा घेऊ शकणार नाही. तसेच बँक कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. (RBI Imposes Restrictions On Mumbai Based Sarvodaya Co-operative Bank Now Customers Will Be Able To Withdraw Only 15,000 Amount From Bank Account)

Reserve Bank restrictions on Bank
'काँग्रेस काळात RBI सरकारची चीअर लीडर!' चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी हे..., RBIचे माजी गव्हर्नर यांचा खळबळजनक आरोप

आता बँके कोणते काम करू शकत नाही?

यासोबतच आता सर्वोदय सहकारी बँक रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा ॲडव्हान्स देऊ शकणार नाही किंवा त्यांचे नूतनीकरणही करू शकणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे. बँके कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही.

सर्वोदय सहकारी बँकेचे ग्राहक फक्त 15,000 रुपये काढू शकतात

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, विशेषत: सर्व बचत बँक किंवा चालू खात्यातील किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

Reserve Bank restrictions on Bank
D Subbarao: तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्यानंतरही भारत गरीबच राहणार; असं का म्हणाले RBIचे माजी गव्हर्नर?

6 महिन्यांसाठी निर्बंध लागू राहतील

बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक अशा निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. RBI ने सांगितले की हे निर्बंध 15 एप्रिल 2024 पासून सहा महिने लागू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.