Reseve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ही कंपनी लोकांना कर्ज देण्याचे काम करते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा दंड ठोठावला आहे.
नियमांचे पालन न केल्यामुळे त्रिशूरस्थित गोल्ड लोन कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय बँकांचे म्हणणे आहे.
कोणत्या कंपनीला दंड ठोठावला:
भारतीय रिझर्व्ह बँकेने मणप्पुरम फायनान्सला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. NBFC नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल RBI ने 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझव्र्ह बँकेने सांगितले की, याचा अर्थ फायनान्सच्या कोणत्याही करारावर त्याचा परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेने सूचना केल्या जारी:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कंपनीची आर्थिक स्थिती मार्च 2021 पर्यंतची तपासणी केली होती. यानंतर कंपनीच्या स्थितीबाबत संपूर्ण अहवाल तयार करून निर्देश देण्यात आले.
या अंतर्गत, कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, ज्यामुळे रिझर्व्ह बँकेने कंपनीवर दंड ठोठावला आहे. तसेच बँकेने कंपनीला 90 दिवसांपेक्षा जास्त काळ थकित असलेले गोल्ड लोन खाते वेगळे करण्यास सांगितले आहे.
मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की 2011 पासून, कंपनीने काही खात्यांमध्ये अनिवार्य कर्जाच्या रकमेवर देखरेख ठेवली नाही. यासोबतच रिझर्व्ह बँकेला इतरही अनेक अडचणी आल्या आहेत.
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँका आणि वित्त कंपन्यांची आर्थिक स्थिती आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे का हे तपासत असते. रिझव्र्ह बँकेला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ती त्यांच्यावर दंड किंवा बंदीची कारवाई करते.
ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम नाही
दरम्यान याबाबत बोलताना आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, मणप्पुरम फयनान्स या संस्थेने नियमांचे उंल्लघ केल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आली आहे.
याचा ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही, ग्राहकांचे व्यवहार सुरळीत सुरू राहातील. यापूर्वी देखील आरबीआयकडून अनेक बँकांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी चार सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.