RBI Action: राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई, 2.5 कोटींचा ठोठावला दंड, काय आहे कारण?

RBI Action: सप्टेंबरपासून आतापर्यंत 20 हून अधिक बँका आणि NBFC कंपन्यांवर RBIने कारवाई केली आहे.
RBI imposes rs 2.5 crore fine on L&T finance for non-compliance
RBI imposes rs 2.5 crore fine on L&T finance for non-compliance Sakal
Updated on

RBI Action: सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग नियमांबाबत ॲक्शन मोडवर आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआय बँकांवर कारवाई करत आहे. सप्टेंबरपासून आतापर्यंत 20 हून अधिक बँका आणि NBFC कंपन्यांवर RBIने कारवाई केली आहे. काही बँकांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. आता RBI ने L&T Finance Limited वर कडक कारवाई करत दंड ठोठावला आहे.

नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) शी संबंधित काही नियमांचे पालन न केल्याबद्दल L&T Finance Limited वर 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

आरबीआयने म्हटले आहे की एल अँड टी फायनान्स लिमिटेडने त्यांच्या कर्जधारकांना दंडात्मक व्याजदरातील बदलाबाबत माहिती दिली नाही. आरबीआयने सांगितले की कंपनीला आर्थिक दंड ठोठावणे आवश्यक आहे आणि सेंट्रल बँकेने कंपनीला 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

RBI imposes rs 2.5 crore fine on L&T finance for non-compliance
Netflix: नेटफ्लिक्सची खेळी! पासवर्ड शेअरिंगवर बंधने असतानाही सब्सक्रिप्शनमध्ये झाली एवढ्या टक्क्यांची वाढ

आरबीआयच्या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI ने काही नियम किंवा तरतुदींचे पालन न केल्याने किंवा नियमांचे उल्लंघन केल्याने हा दंड ठोठावला आहे. त्यामुळे याचा ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही.

L&T ही कंपनी अयोध्येत राम मंदिर बांधत आहे. विशेष म्हणजे या कंपनीने गुजरातमधील जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीसारख्या प्रकल्पांवरही काम केले आहे. आज ती जगातील टॉप-5 बांधकाम कंपन्यांमध्ये गणली जाते.

RBI imposes rs 2.5 crore fine on L&T finance for non-compliance
Kotak Mahindra Bank: उदय कोटक यांच्यानंतर कोटक बँकेची कमान अशोक वासवानी यांच्या हाती, RBIकडून मिळाली मंजुरी

L&T ही 80 वर्षे जुनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्याचे मुख्यालय मुंबईत आहे. सध्या ते जगातील 30 हून अधिक देशांमध्ये बांधकाम करत आहे. अभियांत्रिकी आणि बांधकामाव्यतिरिक्त, L&T माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा यांसारख्या क्षेत्रात देखील काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.