RBI Action: रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; 4 बँकांना ठोठावला दंड, काय आहे कारण?

Reserve Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एसजी फिनसर्व्ह लि. 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित काही अटींचे पालन न केल्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.
Reserve Bank of India
Reserve Bank of IndiaSakal
Updated on

Reserve Bank of India Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एसजी फिनसर्व्हला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित काही अटींचे पालन न केल्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे. SG Finserv पूर्वी मुंगीपा सिक्युरिटीज म्हणून ओळखली जात होती.

RBI वेळोवेळी वित्तीय संस्थांच्या नियमांवर लक्ष ठेवते आणि नियमांचे पालन न केल्यामुळे दंडासारखी कारवाई देखील करते जेणेकरून कंपन्या आणि बँका बँकिंग नियमांचे पालन करतील.

आरबीआयने सोमवारी सांगितले की, इतर गोष्टींबरोबरच 2022-23 या आर्थिक वर्षातील कंपनीच्या आर्थिक तपशीलांमध्ये नोंदणी प्रमाणपत्राशी (सीओआर) संबंधित विशिष्ट अटींचे पालन न केल्याचे उघड झाले आहे. जारी केलेल्या सीओआरमधील विशिष्ट अटींचे पालन न करूनही कंपनीने लोकांकडून ठेवी म्हणून पैसे घेतले आणि कर्ज दिले, असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

Reserve Bank of India
9-Day Leave: ना मीटिंग, ना लॅपटॉप... कर्मचाऱ्यांना कंपनीने दिली 9 दिवसांची सुट्टी; सोशल मीडिया पोस्टवर धुमाकूळ

रिझर्व्ह बँकेने अरुणाचल प्रदेश ग्रामीण बँकेला 14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आर्थिक निकष आणि 'नो युवर कस्टमर'शी (केवायसी) संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Reserve Bank of India
Nobel Prize 2024: डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर
इतर तीन सहकारी बँकांवर आरबीआयची कारवाई

याशिवाय इतर तीन सहकारी बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकांमध्ये जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड-भिंड, मध्य प्रदेश, दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड धरणगाव, महाराष्ट्र आणि श्री कलहस्ती को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लिमिटेड-आंध्र प्रदेश या बँकाचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, या संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम करण्याचा RBI चा उद्देश नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.