RBI Penalty: रिझर्व्ह बँकेने हिरो फिनकॉर्पला ठोठावला लाखोंचा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) Hero Fincorp ला 3.1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यवहार नियमाशी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI Penalty
RBI PenaltySakal
Updated on

RBI Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) Hero Fincorp ला 3.1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यवहार नियमाशी संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. Hero Fincorp वर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना त्यांना समजू शकतील अशा स्थानिक भाषेत कर्जाच्या अटी व शर्तींची लेखी माहिती न दिल्याचा आरोप आहे. 31 मार्च 2023 रोजी आरबीआयने कंपनीच्या आर्थिक स्थितीची तपासणी केली.

कारणे दाखवा नोटीस बजावली होती

रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याने आणि त्यासंदर्भातील पत्रव्यवहार उघडकीस आल्यानंतर हिरो फिनकॉर्पला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की नोटीसनंतर कंपनीच्या प्रतिसादाचा विचार केल्यानंतर आणि वैयक्तिक सुनावणीच्या आधारे, आरबीआयला असे आढळले की कंपनीवरील आरोप कायम आहेत आणि त्यामुळे आर्थिक दंड लादणे आवश्यक आहे.

RBI Penalty
Tax: भारतातील आर्थिक असमानता ऐतिहासिक उच्चांकावर; श्रीमंतांवर कर लावावा, अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटींची शिफारस

Hero Fincorp ची स्थापना डिसेंबर 1991 मध्ये Hero Honda Finlease Limited म्हणून करण्यात आली. हिरो मोटोकॉर्प ही दुचाकी कंपनीची आर्थिक सेवा शाखा आहे. Hero Fincorp टू-व्हीलर फायनान्सिंग, परवडणाऱ्या घरांच्या विभागातील घर खरेदीसाठी आगाऊ रक्कम, शैक्षणिक कर्ज आणि लघु आणि मध्यम उद्योगांना कर्जे यासह अनेक आर्थिक सुविधा पुरवते. कंपनी 4000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

RBI Penalty
GST: निवडणुकीनंतर जीएसटी दरात बदल होणार का? जीएसटी सवलतीचा लाभ गरीबांपेक्षा श्रीमंतांना अधिक

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

कंपनीने नियमांचे योग्य पालन न केल्यामुळेच हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा कंपनीच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही किंवा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहारावर याचा परिणाम होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.