RBI Action: पेटीएम पेमेंट बँकेला RBIचा दणका, ठोठावला 5.39 कोटींचा दंड, काय आहे कारण?

RBI Action on Paytm Payments Bank: RBIने पेटीएम पेमेंट बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI Action on Paytm Payments Bank
RBI Action on Paytm Payments BankSakal
Updated on

RBI Action on Paytm Payments Bank: गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला 5.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

बँकेचे उत्तर मिळाल्यानंतर, आरबीआयने बँकेवर आरबीआयच्या वरील सूचनांचे पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला आणि त्यानंतर बँकेला दंड ठोठावण्यात आला.

RBI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा दंड बँकिंग नियमन कायदा, 1949च्या कलम 46(4)(i) च्या तरतुदींनुसार लावण्यात आला आहे. यावर कारवाई करण्याचा अधिकार आरबीआयला आहे.

सेंट्रल बँकेच्या नियमांनुसार ज्या बँकेवर दंड ठोठावला आहे त्याच बँकेने दंड भरावा लागतो. खातेदारांना ही रक्कम भरावी लागणार नाही.

RBI Action on Paytm Payments Bank
Hunger Index: जागतिक भूक निर्देशांकात भारताची 111व्या क्रमांकावर घसरण; पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती वाईट

पेटीएमच्या शेअर्सची स्थिती

पेटीएमच्या शेअर्सने एका आठवड्यात 7 टक्के, एका महिन्यात 11 टक्के, तीन महिन्यांत 12 टक्के, एका वर्षात 40 टक्के आणि जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 80 टक्के परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडांनी पेटीएमचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी केले - जुलै-सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांनी त्यांचे स्टेक 2.52 टक्क्यांवरून 2.79 टक्क्यांपर्यंत वाढवले.

RBI Action on Paytm Payments Bank
Retail Inflation: दसऱ्यापूर्वी सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा; सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 5 टक्क्यांवर

या अगोदर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दोन सहकारी बँकांवर कारवाई केली होती. नियमांचे पालन न केल्याने श्री वारणा सहकारी बँक आणि राज्य परिवहन सहकारी बँकेला दंड ठोठावण्यात आला होता.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.