RBI Action: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अॅक्सिस बँकेला 90.92 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने गुरुवारी सांगितले की, काही नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवर 42.78 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, KYC चे उल्लंघन केल्यामुळे Axis बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
अॅक्सिस बँकेवर काय आरोप आहे?
काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची ओळख आणि त्यांचे पत्ते यांच्याशी संबंधित नोंदी अॅक्सिस बँकेने ठेवल्या नाहीत असे आरबीआयच्या तपासात आढळून आले आहे. यासोबतच बँकेकडून काही ग्राहकांना सतत कॉल करण्यात येत होते.
काही ग्राहकांना रिकव्हरी एजंट्सनी केलेल्या कॉलचे रेकॉर्डिंग बँकेने ठेवले नाही. त्याच वेळी, चालू खाते उघडताना ग्राहकाकडून घोषणापत्र घेतले नाही.
आरबीआयने अॅक्सिस बँकेला नोटीस पाठवली
RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की Axis बँकेवरील ही कारवाई नियमांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे. आरबीआयने अॅक्सिस बँकेला नोटीस पाठवून कारणे स्पष्ट करण्यास सांगितले आहे. आरबीआयने बँकेला विचारले की जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने बँकेवर दंड का लावला जाऊ नये.
मणप्पुरम फायनान्सलाही ठोठावला दंड
RBI ने मणप्पुरम फायनान्स लिमिटेडला 42.78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या - सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट नॉन-डिपॉझिट टेकिंग कंपनीज आणि डिपॉझिट टेकिंग कंपनीज (रिझर्व्ह बँक) निर्देश 2016' च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 42.78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने म्हटले आहे की, 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कर्जदारांनी तारण ठेवलेल्या सोन्याच्या वस्तूंच्या लिलावातून वसूल केलेल्या अतिरिक्त रकमेच्या काही निर्देशांचे पालन कंपनीने केले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.