UPI Limit Increased: सणासुदीच्या काळात खरेदीसाठी UPI द्वारे करता येणार जास्त पेमेंट; RBIने वाढवली मर्यादा

UPI Limit Increased By RBI: RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI ची व्यवहार मर्यादा वाढवून सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. याशिवाय UPI Lite आणि UPI 123Pay बाबतही एक चांगली बातमी आहे.
UPI Limit Increased By RBI
UPI Limit Increased By RBISakal
Updated on

UPI Limit Increased By RBI: RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI ची व्यवहार मर्यादा वाढवून सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. छोटे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. याशिवाय UPI Lite आणि UPI 123Pay बाबतही एक चांगली बातमी आहे. UPI बाबत तीन मोठे बदल करण्यात आले असून सामान्य लोक आणि छोटे व्यवहार करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

RBIचे 3 मोठे निर्णय कोणते?
  • UPI 123pay ची मर्यादा 5000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे.

  • UPI Lite ची वॉलेट मर्यादा देखील 2000 वरून 5000 रुपये करण्यात आली आहे आणि याचा सामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे कारण ते लहान व्यवहारांसाठी UPI Lite मोठ्या प्रमाणावर वापरतात.

  • UPI Lite ची प्रति व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. प्रति व्यवहार मर्यादा 500 वरून 1000 रुपये करण्यात आली आहे.

UPI Limit Increased By RBI
Hindenburg Research: हिंडनबर्गचे वादळ पुन्हा आले... आता कोणत्या कंपनीवर केला घोटाळ्याचा आरोप?

आरबीआयच्या घोषणांमध्ये, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, UPI व्यवहारांद्वारे भारताच्या आर्थिक क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे देशात पैशाचे व्यवहार अतिशय सुलभ झाले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) सलग दहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही आणि तो 6.5 टक्के कायम ठेवला आहे. रेपो दर सारखाच राहिल्यास गृहकर्ज, वाहन कर्जासह विविध कर्जावरील तुमच्या EMI मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

UPI Limit Increased By RBI
Job Opportunities: आनंदाची बातमी! देशभरात 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार; कोणत्या क्षेत्रात आहे संधी?

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, वित्तीय क्षेत्र निरोगी, लवचिक आणि स्थिर आहे आणि भारतीय चलन रुपया मर्यादेत आहे. सध्याच्या आर्थिक आव्हानांमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे, RBI ने सावध दृष्टीकोन स्वीकारला आहे. भारतीय बँकांचे आरोग्य भक्कम आहे आणि ग्राहक कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या वाढत्या थकबाकीबाबत सावध राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

PwC इंडियाच्या अहवालानुसार, 2028-29 पर्यंत UPI वर एकूण व्यवहार 439 अब्ज असतील जे सध्या 131 अब्ज आहेत. डिजिटल पेमेंटमध्ये 91 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.