‘यूपीआय सर्कल’ सुविधा

भीमपे, गुगलपे, फोनपे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘एनपीसीआय’च्या माध्यमातून ‘यूपीआय सर्कल’ ही नवी सुविधा सादर केली आहे.
 ‘यूपीआय सर्कल’ सुविधा
‘यूपीआय सर्कल’ सुविधाsakal
Updated on

स्मार्ट माहिती

सुधाकर कुलकर्णी , सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

भीमपे, गुगलपे, फोनपे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘एनपीसीआय’च्या माध्यमातून ‘यूपीआय सर्कल’ ही नवी सुविधा सादर केली आहे. या सुविधेमुळे आपण सध्या वापरत असलेल्या भीम, गुगलपे, फोनपे यांसारख्या ‘यूपीआय’ अॅपशी आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र किंवा विश्‍वासू व्यक्तीला जोडून त्याला आपल्या बँक खात्यातून पेमेंट करण्याचा अधिकार देऊ शकतो. असा अधिकार त्याला पूर्णत: किंवा अंशत: देऊ शकतो. अशा व्यक्तीचे स्वतंत्र बँक खाते गरजेचे नाही. होणारा व्यवहार आपल्याच बँक खात्यातून आपल्याच नजरेसमोर होणार असल्याने जोखीम नसते. अधिकार देणाऱ्या व्यक्तीला ‘प्रायमरी युजर’, तर अधिकार दिलेल्या व्यक्तीला ‘सेकंडरी युजर’ असे संबोधले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.