Forex Trading Alert: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अलर्ट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. रिझर्व्ह बँकने अशा संस्थांची यादी जारी केली आहे ज्यांना FEMA म्हणजेच परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 अंतर्गत परकीय चलन व्यापार करण्याची परवानगी नाही.
याचा अर्थ या प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगद्वारे केला जाणाा व्यवहार बेकायदेशीर आहे. जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही ही 19 अनधिकृत प्लॅटफॉर्मची यादी पाहिली पाहिजे. आरबीआय वेळोवेळी ही यादी अपडेट करत असते जेणेकरून व्यापाऱ्यांसोबत होणाऱ्या फसवणुकीच्या घटना थांबवता येतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पूर्वी 56 प्लॅटफॉर्मची यादी जाहीर केली होती आता त्यात भर घालून नवीन 19 प्लॅटफॉर्मची यादी जाहीर केली आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये FX SmartBull, Just Markets, GoDo FX, Admiral Markets, BlackBull, Easy Markets, Enclave. Enclave FX, Finowiz Fintech, FX SmartBull, FX Tray Market, Forex4you, ग्रोइंग कॅपिटल सर्व्हिसेस आणि HF मार्केट यांचा समावेश आहे.
याशिवाय एचवायसीएम कॅपिटल मार्केट्स, जेजीसीएफएक्स, पीयू प्राइम, रिअल गोल्ड कॅपिटल, टीएनएफएक्स, या मार्केट्स आणि गेट ट्रेड यांचाही समावेश करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, या यादीमध्ये त्या संस्था/प्लॅटफॉर्म/वेबसाइट्सची नावे देखील समाविष्ट आहेत जी अनधिकृत संस्थांना प्रोत्साहन देत आहेत.
नवीन 19 प्लॅटफॉर्मची यादी :
1. Admiral Market https://admiralmarkets.com
2. BlackBull https://blackbull.com
3. Easy Markets https://www.easymarkets.com
4. Enclave FX https://enclavefx.com
5. Finowiz Fintech Limited https://finowiz.com
6. FX SmartBull https://www.fxsmartbull.com
7. Fx Tray Market https://www.fxtray.com
8. Forex4you https://www.forex4you.com
9. GoDo FX https://www.godofx.com
10. Growing Capital Services Ltd. https://www.growingcapital.uk
11. HF Markets https://www.hfm.com
12. HYCM Capital Markets https://hycm.com
13. JGCFX https://jgcfx.com
14. Just Markets https://justmarkets.com
15. PU Prime https://in.puprime.com
16. Real Gold Capital Ltd. https://www.realgoldcapitals.com
17. TNFX https://tnfx.co
18. Ya Markets https://www.yamarkets.com
19. Gate Trade Mobile Application
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.