Paytm: पेटीएमच्या अडचणीत वाढ! RBI पेटीएम पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना करू शकते रद्द; शेअर्समध्ये मोठी घसरण

RBI May Cancel Paytm Payments Bank Banking License: पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रद्द करू शकते. आरबीआय पेटीएमची बँकिंग शाखा पीपीबीएलचा परवाना रद्द करू शकते, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
RBI May Cancel Paytm Payments Bank Banking License
RBI May Cancel Paytm Payments Bank Banking LicenseSakal
Updated on

RBI May Cancel Paytm Payments Bank Banking License (Marathi News): पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) रद्द करू शकते. असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना रद्द करण्यासारखे पाऊल उचलू शकते.

या वृत्तानंतर One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी घसरून 409.68 रुपयांवर व्यवहार करत होते. शेअर्सचे लोअर सर्किट 393.70 आहे. (Report suggests PPBL may lose banking license, Paytm shares slip)

कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
कंपनीच्या शेअर्समध्ये घसरणSakal

अलीकडेच अर्थ मंत्रालयाने पेटीएम पेमेंट्स बँकेला मनी लाँड्रिंगसाठी दंड ठोठावला आहे. सरकारने PMLA (Prevention of Money Laundering Act) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. वित्त मंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट (FIU) ने रिझर्व्ह बँकेसह इतर एजन्सीच्या कारवाईचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. पेटीएम पेमेंट्स बँके अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतल्याची माहिती आहे.

RBI May Cancel Paytm Payments Bank Banking License
गुंतवणुकीचा दासबोध

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई का केली?

पेटीएम पेमेंट्स बँकेने एकाच पॅन कार्डवर हजारो खाती उघडल्याचे आरबीआयला त्यांच्या तपासणीत आढळून आले होते. तपासात एक-दोन नव्हे तर अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली. एवढेच नाही तर या खात्यांमध्ये कोट्यवधींचे व्यवहारही झाले. या तपासणीनंतरच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली.विजय शेखर शर्मा

विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा

26 फेब्रुवारी रोजी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर बोर्डाचे सदस्य आहेत.

RBI May Cancel Paytm Payments Bank Banking License
मुलांच्या आर्थिक सजगतेत आईची भूमिका

याशिवाय सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे मंडळाचे सदस्य आहेत.

पेटीएम ॲप, पेटीएम क्यूआर, पेटीएम साउंडबॉक्स आणि पेटीएम कार्ड मशीन्स काम करत राहावेत यासाठी कंपनी अनेक पावले उचलत आहे. पेटीएम वारंवार आश्वासन देत आहे की या सेवा भविष्यात सुरू राहतील. काही दिवसांपूर्वीच, पेटीएमने घोषणा केली होती की ते इतर बँकांसह नवीन करार करतील.

RBI ने घोषणा केली होती की पेटीएमचे UPI हँडल पेटीएम पेमेंट्स बँकेऐवजी काही निवडक बँकांना दिले जाईल जेणेकरून सेवांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ला या संदर्भात विचार करण्यास सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()