RBI Interest Rate Cut: यूएस फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून (RBI) लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. परंतु देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी यांचे मत आहे की, भारतात व्याजदर कपातीसाठी लोकांना फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागेल. एसबीआयचे अध्यक्ष म्हणाले की, रिझर्व्ह बँक फेब्रुवारीमध्ये व्याजदरात 25 बेसिस पॉइंटने कपात करू शकते.