Stock Market: RBIचा एक निर्णय अन् शेअर बाजार तुफान तेजीत; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, कोणते 10 शेअर्स वाढले?

Stock Market: गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सलग सहा दिवस घसरण सुरू होती, त्याला हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मंगळवारी ब्रेक मिळाला. त्यामुळे बुधवारी बाजाराचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीच्या निकालांवर लागले होते
RBI Monetary Policy Meeting LIVE Updates
RBI Monetary Policy Meeting LIVE Updates Sakal
Updated on

Stock Market: गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात सलग सहा दिवस घसरण सुरू होती, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मंगळवारी ब्रेक मिळाला. त्यामुळे बुधवारी बाजाराचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीच्या निकालांवर लागले होते आणि सेन्सेक्स-निफ्टी संथ वाढीसह व्यवहार करत होते. परंतु आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर स्थिर ठेवताच बाजारात उत्साह आला आणि अचानक सेन्सेक्सने 600 अंकांची उसळी घेतली.

सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सकाळी 10 वाजता रेपो दराच्या निर्णयांची माहिती देताच त्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आणि सेन्सेक्सने वेग घेतला. सेन्सेक्स 670 अंकांच्या वाढीसह 82,319 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Stock Market Today
Stock MarketSakal

सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही हिरव्या चिन्हावर व्यवहार करण्यास सुरुवात केली. 25,013 च्या आधीच्या बंदच्या तुलनेत तो 25,065 च्या पातळीवर उघडला होता. RBI च्या निर्णयानंतर सेन्सेक्सने वेग पकडताच निफ्टी-50 देखील पळू लागला आणि तो 215 अंकांच्या किंवा 0.84% ​​च्या वाढीसह 25,227 च्या पातळीवर पोहोचला.

RBI Monetary Policy Meeting LIVE Updates
Job Opportunities: आनंदाची बातमी! देशभरात 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार; कोणत्या क्षेत्रात आहे संधी?
Stock Market Today
Stock MarketSakal
कोणते 10 शेअर्स सर्वाधिक वाढले?

सर्वाधिक वेगाने धावणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्सचा शेअर 3.16% वाढीसह 7417.90 रुपयांवर व्यवहार करत होता. तर भारती एअरटेलचा शेअर 2.67% च्या वाढीसह 1702.60 रुपयांवर व्यवहार करत होता. टाटा समूहाची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सचा शेअर 2.63% वाढून 944 रुपये आणि ॲक्सिस बँकेचा शेअर 3.58% वाढून 1182 रुपयांवर पोहोचला.

Stock Market Today
BSE SENSEXSakal

देशातील सर्वात मोठी बँक SBI चे शेअर्स 2.33% च्या वाढीसह 800.25 रुपयांवर व्यवहार करताना दिसले. आयसीआयसीआय बँक, टायटन, मारुती, टाटा स्टील, टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्सही वाढले. मिडकॅपमध्ये सुझलॉनचा शेअर 8.12%, टोरेंट पॉवर शेअर 6.35%, एक्साइड इंडिया शेअर 5.65% आणि GICREचा शेअर 5.13% वाढीसह व्यवहार करत आहे.

RBI Monetary Policy Meeting LIVE Updates
Hindenburg Research: हिंडनबर्गचे वादळ पुन्हा आले... आता कोणत्या कंपनीवर केला घोटाळ्याचा आरोप?
आरबीआयने रेपो दर पुन्हा स्थिर ठेवले

RBI MPC बैठकीत घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलताना, केंद्रीय बँकेने सलग 10 व्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याची घोषणा केली. यासोबतच रिव्हर्स रेपो रेट 3.35% आणि बँक रेट 6.75% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.

7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, यावेळी एमपीसीमध्ये 3 नवीन सदस्य जोडले गेले आहेत आणि जागतिक परिस्थितीसह इतर बाबींचा विचार केल्यानंतर, बैठकीत 6 पैकी 5 सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याच्या बाजूने मत दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.