RBI MPC Meeting: RBI च्या 8 मोठ्या घोषणा; तुमच्या आर्थिक बजेटवर होणार परिणाम, जाणून घ्या मोठे निर्णय

2023-24 या आर्थिक वर्षासाठी धोरण समितीच्या पहिल्या बैठकीत काय घोषणा करण्यात आल्या ते जाणून घ्या.
RBI MPC Meeting
RBI MPC MeetingSakal
Updated on

RBI MPC Meeting Big Decision: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी चलनविषयक धोरण समितीच्या पहिल्या बैठकीत रेपो दरात वाढ न करून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जागतिक स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती आहे, ज्याचा परिणाम भारतावरही झाला आहे.

रेपो रेटमध्ये दिलासा देण्याबरोबरच, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नागरिकांसाठी इतरही अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे अनेक सुविधा उपलब्ध होतील.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी धोरण समितीच्या पहिल्या बैठकीत काय घोषणा करण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊया. (RBI MPC 8 big announcements Central bank keeps repo rate constant, other key takeaways)

आरबीआयच्या बैठकीतील मोठ्या घोषणा :

  • सर्वप्रथम, शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळी रेपो दरात कोणतीही वाढ होणार नाही, म्हणजेच आरबीआयचा रेपो दर 6.50 टक्के राहील.

  • आर्थिक वर्ष 2024 साठी, आर्थिक विकास दर 6.4 टक्के ते 6.5 टक्के असा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर 7.8 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.9 टक्के राहील.

  • महागाईवर आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, काम अजून संपलेले नाही. जोपर्यंत महागाई आरबीआयच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे काम सुरू राहील.

RBI MPC Meeting
Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतरही अदानी समूहावर विश्वास कायम! काय म्हणतो सर्वात मोठा गुंतवणूकदार
  • RBI ने आर्थिक वर्ष 2024 साठी महागाई दराचा अंदाज 5.3 टक्क्यांवरून 5.2 टक्क्यांवर आणला आहे.

  • सिबिल स्कोअरबाबत, आरबीआयने सांगितले की, जर कोणी तुमचा सिबिल स्कोअर तपासला तर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.

  • CIBIL स्कोअर अंतर्गत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास, ती देखील संस्थांना लवकरच सोडवावी लागेल.

  • गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात चालू खात्यातील तूट 2.7 टक्के होती आणि ती जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 2.2 टक्क्यांवर आली आहे.

  • याशिवाय आरबीआय स्वतःचे पोर्टल सुरू करणार आहे.

RBI MPC Meeting
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.