RBI MPC Meeting: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर होणार थेट परिणाम

RBI MPC Meeting 2024 Updates: RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तिसऱ्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. आज RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दरा कोणताही बदल करण्यात आला नाही.
RBI MPC Meeting 2024 Updates
RBI MPC Meeting 2024 UpdatesSakal
Updated on

RBI MPC Meeting 2024 Updates: RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तिसऱ्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. आज RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या रेपो दर 6.50% वर कायम आहे.

FY2024-25 ची दुसरी MPC बैठक निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जूनमध्ये झाली होती, त्यावेळीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. यावेळी अर्थसंकल्पानंतर ही बैठक झाली आहे.

अशा परिस्थितीत कदाचित आरबीआय या वेळी व्याजदर कमी करेल, अशी आशा लोकांना होती मात्र असे काही झाले नाही. सर्वसामान्यांना यावेळीही कर्जाबाबत कोणताही दिलासा मिळाला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून एमपीसीच्या 7 बैठका झाल्या, पण त्यादरम्यान रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. रेपो दर 6.50% वर कायम आहे.

RBI MPC Meeting 2024 Updates
Veg Thali Price: सर्वसामान्यांना झटका! श्रावणाच्या तोंडावर शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली; काय आहे कारण?

रेपो दर म्हणजे काय?

ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात आणि निश्चित व्याजासह परतफेड करतात, त्याचप्रमाणे सार्वजनिक, खाजगी आणि व्यावसायिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणे आवश्यक असते.

अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांना ज्या व्याजदराने कर्ज दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो आणि रेपो दर वाढला की सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतात. रेपो दर वाढला की बँकांना जास्त व्याजदराने कर्ज मिळते. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होते. त्याचवेळी रेपो दर कमी झाला की कर्जे स्वस्त होतात.

RBI MPC Meeting 2024 Updates
Dell Layoffs: डेल कंपनीचा मोठा निर्णय! अनेक मोठ्या अधिकाऱ्यांसह 12,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची केली कपात

रेपो रेट हे महागाईशी लढण्याचे शक्तिशाली साधन आहे

रेपो दर हे महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे, ज्याचा RBI वेळोवेळी परिस्थितीनुसार वापर करते. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा RBI अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते.

सहसा 0.50 किंवा त्यापेक्षा कमी वाढ केली जाते. परंतु जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जाते, तेव्हा पैशाचा प्रवाह वाढवण्याची गरज असते आणि अशा स्थितीत आरबीआय रेपो दर कमी करते आणि गरज नसल्यास, रेपो दर काही काळ स्थिर ठेवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.