RBI Rule: रिझर्व्ह बँकेने बदलला रिस्क वेटज नियम, कर्जदारांचं होणार मोठं नुकसान?

RBI Rule: तज्ज्ञांचे काय मत आहे?
RBI new regulations impact on nbfcs and banks may hike interest rates of retail loans
RBI new regulations impact on nbfcs and banks may hike interest rates of retail loans Sakal
Updated on

RBI Rule: आरबीआयने बँका आणि एनबीएफसीच्या असुरक्षित कर्जासाठी जोखीम वेटेज वाढवले आहे. आरबीआयचा हा निर्णय विशेषतः एनबीएफसीसाठी दुहेरी धक्का आहे. कारण बँकांकडून मिळणारे कर्ज महाग होईल आणि भांडवली शुल्कही वाढेल.

अनेक ब्रोकरेज हाऊसनी यासंदर्भात त्यांचे अहवाल प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा बँकांवर काय परिणाम झाला याचे मूल्यांकन केले गेले आहे.

गुरुवारी आरबीआयने बँका आणि NBFCs च्या ग्राहक कर्जाचे जोखीम वेटेज 125% पर्यंत वाढवण्याचे निर्देश जारी केले, जे आधी 100% होते. बँकांच्या ग्राहक कर्जांमध्ये वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो आणि गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यातून वगळले आहेत.

त्याचप्रमाणे बँकांच्या क्रेडिट कार्डवरील जोखीम वेटेज 150% पर्यंत वाढविण्यात आले आहे, तर NBFCs कडील क्रेडिट कार्डवरील वेटेज 125% असेल, जे पूर्वी 100% होते.

RBI new regulations impact on nbfcs and banks may hike interest rates of retail loans
RBI Action: रिझर्व्ह बँकने Axis Bank आणि मणप्पुरम फायनान्सला ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

तज्ज्ञांचे काय मत आहे?

मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की जवळजवळ सर्व मोठ्या बँकांची किरकोळ असुरक्षित कर्जे 20-60% वार्षिक दराने वाढत आहेत आणि हे गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेसाठी चिंतेचे कारण बनले आहे. आमचा अंदाज आहे की जोखीम वेटेज वाढल्यानंतर, बँका त्यांच्या नफ्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी व्याजदर वाढवू शकतात.

जोखीम वेटेज बदलानंतर, बँका त्यांच्या नफ्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी या उत्पादनांवर व्याजदर वाढवू शकतात. NBFC साठी कर्ज महाग होईल कारण बँका कर्जाचे दर वाढवतील.

RBI new regulations impact on nbfcs and banks may hike interest rates of retail loans
Adani Group: अदानी समूह आणखी एक सिमेंट कंपनी खरेदी करणार? काय आहे प्लॅन

याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता बँका आणि एनबीएफसींना ग्राहकांना कर्ज देण्यासाठी अधिक भांडवल लागेल. ते ग्राहकांवर बोजा टाकण्याचा प्रयत्न करतील. यामुळे अशा सर्व कर्जाचे व्याजदर वाढणार आहेत. म्हणजेच आता कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()