Tata Sons: टाटांचा प्लॅन RBIने मान्य केला नसता तर.., शेअर बाजारच नव्हे तर अर्थव्यवस्थेतही उडाला असता गोंधळ

Tata Sons RBI: टाटा समूहाचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे. हा संपूर्ण व्यवसाय टाटा सन्सची होल्डिंग कंपनी हाताळते. टाटा सन्सला 2022 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी-अपर लेयर (NBFC-UL) दर्जा दिला.
RBI
Tata Sons RBISakal
Updated on

Tata Sons: टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा व्यावसायिक समूह आहे. टाटा समूहाची एक महत्त्वाची योजना देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयने स्वीकारली आहे. तसे झाले नसते तर त्याचा परिणाम फक्त संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर शेअर बाजार, आशिया आणि जागतिक स्तरावर झाला असता.

टाटा समूहाचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे. हा संपूर्ण व्यवसाय टाटा सन्सची होल्डिंग कंपनी हाताळते. टाटा सन्सला 2022 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी-अपर लेयर (NBFC-UL) दर्जा दिला. त्याआधी, ऑक्टोबर 2021 मध्ये, RBI ची मार्गदर्शक तत्त्वे आली होती ज्यामध्ये देशातील सर्व NBFC-ULs ने सप्टेंबर 2025 पर्यंत स्टॉक मार्केटमध्ये स्वतःला लिस्ट करावे अशी सूचना करण्यात आली होती.

टाटा समूहाच्या 26 कंपन्या सध्या शेअर बाजारामध्ये लिस्ट आहेत. याशिवाय, इतर अनेक कंपन्या आहेत ज्या थेट होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अखत्यारीत येतात. टाटा सन्सचे मूल्यांकन 400 अब्ज डॉलर्स (सुमारे 33,49,600 कोटी रुपये) आहे.

अशा परिस्थितीत टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट केल्याने शेअर बाजारात अराजकता निर्माण होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल, असा टाटा समूहाचा अंदाज होता.

RBI
BSE bankex:बीएसई बँकेक्स’

एवढ्या मोठ्या मूल्यांकनाची कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली तर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारासह आशिया खंडातही दिसून येईल. त्यामुळे आरबीआयची मार्गदर्शक तत्त्वे पाळता येतील आणि टाटा सन्सला शेअर बाजारात लिस्ट करावे लागणार नाही, असे प्रयत्न टाटा समूह करत होता. टाटा समूहाने 2017 मध्येच टाटा सन्सचे प्रायव्हेटमधून पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर केले होते.

RBI
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक पदक विजेत्यांना मिळणार विंडसर कार; उद्योगपतीने केली गिफ्टची घोषणा

टाटा समुहाने टाटा सन्सला लिस्ट न करण्याची आरबीआयकडे सूट मागितली होती. त्यासाठी त्यांनी योजना आखली होती. टाटा सन्सने त्या योजनेच्या काही भागांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता टाटा सन्सचा NBFC-UL दर्जा संपणार आहे. टाटा सन्स पुन्हा आपल्या समूहातील काही कंपन्यांची पुनर्रचना करेल.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत, टाटा सन्सवर सुमारे 15,200 कोटी रुपयांचे निव्वळ कर्ज होते. तर एकट्या कंपनीकडे जवळपास 2500 कोटी रुपयांचा रोख साठा आहे. एवढेच नाही तर भविष्यात टाटा सन्स जी काही गुंतवणूक करेल, ती लाभांश आणि रोख राखीव रकमेतून करेल.

RBI
Silver Price: चांदीला येणार सोन्याचे दिवस! भाव एक लाख रुपयांच्या पुढे जाणार, काय आहे कारण?

रतन टाटांनी दिला होता सल्ला

टाटा सन्सने लिस्टिंगमधून सूट मिळण्यासाठी आरबीआयशी संपर्क साधण्यापूर्वी रतन टाटा यांचाही सल्ला घेतला होता. रतन टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत.

टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे. हा ट्रस्ट टाटा परिवारातील लोकांनी सुरू केला आहे. टाटा ट्रस्टमध्ये टाटा कुटुंबातील इतर अनेक ट्रस्ट समाविष्ट आहेत, ज्यापैकी सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट हे सर्वात मोठे ट्रस्ट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.