RBI Action: पेटीएम सारखी RBIची आणखी एक कारवाई; 'या' कंपनीवर गोल्ड लोन देण्यास घातली बंदी, शेअर्स 20 टक्के घसरले

IIFL Finance: अलीकडेच पेटीएम पेमेंट बँकेच्या बँकिंग व्यवसायावर बंदी घातल्यानंतर, आता रिझर्व्ह बँकेने आणखी एका कंपनीवर अशीच कारवाई केली आहे. आरबीआयने या फायनान्स कंपनीला आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन देणे बंद करण्यास सांगितले आहे.
RBI orders immediate ban on IIFL Finance from sanctioning, disbursing gold loans
RBI orders immediate ban on IIFL Finance from sanctioning, disbursing gold loans Sakal
Updated on

IIFL Finance (Marathi News): अलीकडेच पेटीएम पेमेंट बँकेच्या बँकिंग व्यवसायावर बंदी घातल्यानंतर, आता रिझर्व्ह बँकेने आणखी एका कंपनीवर अशीच कारवाई केली आहे. आरबीआयने या फायनान्स कंपनीला आपल्या ग्राहकांना गोल्ड लोन देणे बंद करण्यास सांगितले आहे. आयआयएफएल फायनान्सवर रिझर्व्ह बँकेने ही कठोर कारवाई केली आहे. (RBI orders immediate ban on IIFL Finance from sanctioning, disbursing gold loans)

आरबीआयने सोमवारी एक आदेश जारी करून बिगर बँकिंग फायनान्स कंपनी IIFL फायनान्सला नवीन गोल्ड लोन देण्यावर बंदी घातली आहे. आआरबीआयच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीदरम्यान, गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आली आहे. याचा अर्थ आता ही NBFC कंपनी आपल्या ग्राहकांना कोणतेही नवीन गोल्ड लोन देऊ शकणार नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या कामकाजाचे विशेष ऑडिट केले जाईल. विशेष लेखापरीक्षणानंतर निर्बंधांवर पुनर्विचार करण्यात येणार आहे. आयआयएफएलच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीत कर्ज मंजूरीच्या वेळी आणि लिलावाच्या वेळी सोन्याची शुद्धता आणि निव्वळ वजन तपासण्यात गंभीर त्रुटींचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून, RBI कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन आणि लेखा परीक्षकांशी या त्रुटींवर चर्चा करत आहे. मात्र, आजपर्यंत कंपनीने कोणतीही सुधारणा केली नाही. आरबीआयने म्हटले आहे की, यामुळे ग्राहकांच्या हितासाठी व्यावसायिक निर्बंध लादणे आवश्यक होते.

RBI orders immediate ban on IIFL Finance from sanctioning, disbursing gold loans
Richest Person: ॲमेझॉनचे जेफ बेझोस बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्कची दुसऱ्या स्थानावर घसरण, काय आहे कारण?

आरबीआयच्या कारवाईचा परिणाम IIFL फायनान्सच्या शेअरवर दिसून आला आहे. आयआयएफएल शेअर्स कोसळले आहेत. शेअर बाजार उघडताच कंपनीचे शेअर लोअर सर्किटवर आले आणि ते 19.99 टक्क्यांनी घसरून 477.75 रुपयांच्या पातळीवर गेले.

IIFL चा कर्ज व्यवसाय 77,444 कोटी रुपयांचा आहे, त्यापैकी 32 टक्के फक्त सोन्याचे कर्ज आहे. सोन्याच्या कर्जाच्या व्यवसायात ते देशातील अव्वल NBFC मध्ये आहे. कंपनीचा गोल्ड लोन पोर्टफोलिओ 24,692 कोटी रुपयांचा आहे.

आरबीआयच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण देताना, आयआयएफएल फायनान्सचे एमडी निर्मल जैन यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनीच्या गोल्ड लोन व्यवसायावर आरबीआयची कारवाई ऑपरेशनल समस्यांमुळे आहे.

RBI orders immediate ban on IIFL Finance from sanctioning, disbursing gold loans
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सचे शेअर्स सेन्सेक्स-निफ्टीमधून बाहेर पडणार का? डिमर्जरचा काय परिणाम होणार

निर्मल वर्मा यांनी 1995 मध्ये IIFL फायनान्स सुरू केले. कंपनी आधी IIFL होल्डिंग्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. आरबीआयने कंपनीवर केलेल्या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.