Bank Open on 31 March: लाखो बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका अधिसूचनेत आदेश दिले आहेत की 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही, सर्व बँका खुल्या राहतील. 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने, सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून RBIने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने अधिसूचना जारी करून सांगितले की, "भारत सरकारने सरकारी पावत्या आणि देणी हाताळणाऱ्या बँकांच्या सर्व शाखा 31 मार्च 2024 (रविवार) रोजी सुरु ठेवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून आर्थिक वर्ष 2023 मधील पावत्या आणि पेमेंटशी संबंधित सर्व व्यवहार व्यवस्थित ठेवता येतील.''
भारतीय रिझर्व्ह बँक केंद्र आणि राज्य सरकारचा बँकिंग व्यवसाय त्यांच्या स्वत: च्या कार्यालये आणि एजन्सी बँकांद्वारे करते.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका (After Integration)
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
इंडियन बँक
इंडियन ओव्हरसीज बँक
पंजाब आणि सिंध बँक
पंजाब नॅशनल बँक
स्टेट बँक ऑफ इंडिया
युको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
ॲक्सिस बँक लिमिटेड
सिटी युनियन बँक लिमिटेड
डीसीबी बँक लिमिटेड
फेडरल बँक लिमिटेड
एचडीएफसी बँक लिमिटेड
ICIC बँक लिमिटेड
IDBI बँक लिमिटेड
IDFC फर्स्ट बँक लिमिटेड
इंडसइंड बँक लिमिटेड
जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड
कर्नाटक बँक लिमिटेड
करूर वैश्य बँक लिमिटेड
कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
आरबीएल बँक लिमिटेड
साउथ इंडियन बँक लिमिटेड
येस बँक लिमिटेड
धनलक्ष्मी बँक लिमिटेड
बंधन बँक लिमिटेड
CSB बँक लिमिटेड
तामिळनाडू मर्कंटाइल बँक लिमिटेड
प्राप्तिकर विभागाने आपली सर्व कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गुड फ्रायडेसह शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही विभागाने रद्द केल्या होत्या. गुड फ्रायडेमुळे आयकर विभागाने या महिन्यात येणारा लाँग वीकेंड रद्द केला होता. गुड फ्रायडे 29 मार्च रोजी आहे.
30 मार्चला शनिवार आणि 31 मार्चला पुन्हा रविवार आहे. त्यामुळे 3 दिवसांची मोठी सुट्टी होती. त्यामुळे विभागाची अनेक कामे आर्थिक वर्षअखेर रखडणार होती. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे 29, 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आयटी कार्यालये सुरू राहतील, असे आयकर विभागाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.