मुंबई : लोकप्रिय आणि सहकार क्षेत्रातील मोठ्या अशा अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने एका वर्षासाठी बरखास्त केले आहे. मात्र बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही निर्बंध लादले नसल्याचेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार अभ्यूदय बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.
स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची रिझर्व बँकेने अभ्युदय बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकांना त्यांच्या कामात सहाय्य करण्यासाठी रिझर्व बँकेने सल्लागार मंडळाचीही नियुक्ती केली आहे. स्टेट बँकेचे माजी सरव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महिंद्र छाजेड आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश सल्लागार मंडळावर करण्यात आला आहे.
बँकेच्या प्रशासनातून प्रशासन कार्यपद्धतीतून काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे हा निर्णय घेतल्याने रिझर्व बँकेने म्हटले आहे. अभ्युदय बँकेच्या कामकाजावर कोणतेही आर्थिक निर्बंध लादण्यात आले नसून बँक आपले दैनंदिन व्यवहार नेहमीसारखे करू शकेल, असेही रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी म्हटले आहे.
अभ्युदय सहकारी बँक 1964 मध्ये सुरू झाली. 5000 रुपये देऊन बँकेची सुरूवात करण्यात आली आहोती. दुधाचे व्यापारी आणि लघुउद्योजकांसाठी ही सुरू करण्यात आली होती. यानंतर जून 1965 मध्ये अभ्युदय को-ऑप. बँक सुरू झाली. 1988 मध्ये, बँकेला आरबीआयने शेड्यूल बँकेच्या श्रेणीत टाकले. त्यानंतर मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकेच्या शाखा सुरू झाल्या. बँक महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकातही व्यवसाय करते.
सहकारी बँका लहान व्यावसायिक आणि सामान्य लोकांना मदत करण्यासाठी सहकारी बँका सुरू करण्यात आल्या. विशेषतः ग्रामीण भागात बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना चालना देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.