RBI: रिझर्व्ह बँक उद्यापासून करणार पायलट प्रोजेक्ट सुरू, कर्ज मिळणे होणार सोपे, कोणाला होणार फायदा?

RBI Pilot Project: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली
RBI
RBI Sakal
Updated on

RBI Pilot Project:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्टपासून सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म अर्थात पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. या पब्लिक टेक प्लॅटफॉर्मद्वारे, RBI वंचित भागात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि लोकांंचा आर्थिक समावेश वाढवण्यासाठी काम करेल.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब (RBIH) कर्ज सहज उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करत आहे.

RBI कोणत्या प्रकारचे कर्ज देईल?

आरबीआयने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर पायलट प्रकल्पादम्यान, 1.6 लाख रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दूध उत्पादकांना कर्ज, एमएसएमई उद्योगांना कोणत्याही तारण न देता कर्ज देता येणार आहे. वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज या माध्यमातून देता येईल.

RBI
Multibagger Stocks: 3 वर्षात 9 पट वाढ, टाटाच्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

कोणत्याही अडचणीशिवाय कर्ज वितरण होणार सुलभ

रिझर्व्ह बँकेला डिजिटलच्या मदतीने कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज वितरण सुलभ करायचे आहे. यासाठी आरबीआय 17 ऑगस्ट रोजी प्रायोगिक तत्त्वावर सार्वजनिक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे.

देशाच्या मध्यवर्ती बँकेला आशा आहे की या प्लॅटफॉर्मवर, ओपन अॅप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) आणि उद्योग मानकांद्वारे, अशा लोकांना कर्ज दिले जाऊ शकते ज्यांना कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध नाही.

RBI
Anil Pant Passes Away: अ‍ॅपटेक कंपनीचे एमडी अनिल पंत यांचे निधन

आरबीआयने सांगितले की, 17 ऑगस्ट रोजी हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला जाईल आणि या कालावधीत मिळालेल्या अनुभवांच्या आधारे कर्जदारांनाही या कक्षेत आणले जाईल.

पब्लिक टेक प्लॅटफॉर्मवर आधारच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक केवायसी, राज्य सरकारांच्या जमिनीच्या नोंदी, पॅनची वैधता, आधार ई-स्वाक्षरी आणि घर आणि मालमत्ता शोधण्याचे काम करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.