Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत RBIचा मोठा इशारा; राज्यांनी आश्वासने...

Old Pension Scheme: आरबीआयच्या नव्या अहवालात राज्यांना याविरोधात इशारा देण्यात आला आहे.
RBI warns, states should not make old pension scheme promises, expenditure will become unbearable
RBI warns, states should not make old pension scheme promises, expenditure will become unbearable Sakal
Updated on

Old Pension Scheme: काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा विचार सुरू आहे आणि अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाबचा समावेश आहे. कर्नाटकातही अंमलबजावणी होणार असल्याची चर्चा आहे.

आरबीआयच्या नव्या अहवालात राज्यांना याविरोधात इशारा देण्यात आला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘स्टेट फायनान्स: अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2023-24’ या अहवालात असे म्हटले आहे की, जर सर्व राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली तर त्यांच्यावरचा आर्थिक बोजा NPS च्या तुलनेत 4.5 पटीने वाढेल.

अहवालात म्हटले आहे की 2060 पर्यंत जुनी पेन्शन योजनेच्या खर्चाचा अतिरिक्त भार GDP च्या 0.9 टक्क्यांपर्यंत वाढेल. अहवालानुसार, काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे आणि काही राज्ये ही योजना लागू करण्याचा विचार करत आहेत. तसे झाल्यास राज्यांवरील आर्थिक बोजा वाढेल आणि राज्यांचा विकास कामांवरील खर्च कमी होईल.

RBI warns, states should not make old pension scheme promises, expenditure will become unbearable
Sebi: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेत? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा...

पुढील वर्षी होणा-या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आरबीआयने लोकप्रिय आश्वासनांच्या नावाखाली ओपीएस लागू न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांनी आपापल्या स्तरावर महसूल वाढवण्याच्या मार्गांचा विचार करावा, असेही म्हटले आहे. आरबीआयने म्हटले आहे की, राज्यांनी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क वाढवून उत्पन्न वाढविण्याचा विचार करावा.

RBI warns, states should not make old pension scheme promises, expenditure will become unbearable
GST Notice: एलआयसीला पुन्हा GST ची नोटीस; व्याज आणि दंडासह केली 183 कोटींची मागणी, काय आहे प्रकरण?

RBI ने म्हटले आहे की ओपीएस लागू करणे हा चांगला निर्णय नाही. यामुळे भावी पिढ्यांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. अहवालानुसार, OPS ची शेवटची बॅच 2040 च्या सुरुवातीला निवृत्त होईल आणि त्यांना 2060 पर्यंत पेन्शन मिळत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.