RBI on 2000 Rupees Notes: तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात 2000 ची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आरबीआयने याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ही सुविधा 1 एप्रिलपासून मिळणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. (RBI will not exchange or deposit Rs 2,000 notes on April 1)
बँकांमधील वार्षिक लेखासंबंधीच्या कामामुळे, 1 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच सोमवारी 2000 रुपयांची नोट बदलून किंवा जमा करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की ही सुविधा मध्यवर्ती बँकेच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा सुरु केली जाईल.
RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा केली होती. बँकेने म्हटले आहे की 29 फेब्रुवारी रोजी कामकाज संपेपर्यंत, 2,000 रुपयांच्या सुमारे 97.62 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत आणि केवळ 8,470 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत.
31 मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे, परंतु ही तारीख रविवारी येते. त्यामुळे रविवारी बँका सुरू राहणार आहेत. आरबीआयने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, सरकारी काम करण्यासाठी बँकांना त्यांची कार्यालये आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी उघडावी लागतील. (Facility to exchange, deposit Rs 2,000 notes not available on April 1 says RBI)
याआधी 30 मार्च हा महिन्याचा पाचवा शनिवार असल्याने बँकाही सुरू राहणार आहेत. मात्र, आज म्हणजेच 29 मार्चला गुड फ्रायडेच्या सुट्टीमुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.