Gold Buying: RBIने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले सोने; मध्यवर्ती बँका सोने खरेदी का करत आहे?

Central Banks Gold Buying: भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आरबीआयची खरेदी 20 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेली.
RBI's gold purchase highest in almost two years Why are central banks buying gold
RBI's gold purchase highest in almost two years Why are central banks buying goldSakal
Updated on

Central Banks Gold Buying: भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आरबीआयची खरेदी 20 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेली. तर गेल्या दोन महिन्यांत आरबीआयने सोने खरेदी करणे टाळले आहे.

सोन्याच्या किंमती वाढण्यात मध्यवर्ती बँकांचा मोठा वाटा आहे. सोन्याच्या भावात सध्या विक्रमी वाढ होत आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने 66 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर आंतरराष्ट्रीय किंमती 2,200 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर आहे.

RBI's gold purchase highest in almost two years Why are central banks buying gold
PSU Banks: सरकार 'या' 5 सरकारी बँकांमधील हिस्सा कमी करणार, तुमची बँक आहे का?

जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून 39 टन सोन्याची निव्वळ खरेदी करण्यात आली. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झालेला हा सलग 8वा महिना आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी डिसेंबर 2023 मध्ये एकूण 17 टन सोने खरेदी केले होते.

खरेदीच्या बाबतीत कोणता देश पुढे आहे?

अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये सर्वाधिक खरेदी सेंट्रल बँक ऑफ तुर्कीने (CBRT) केली होती. तुर्कस्तानच्या सेंट्रल बँकेने या काळात सोन्याचा साठा 12 टनांनी वाढवला. जानेवारी 2024 ऑक्टोबरच्या अखेरीस तुर्कीचा सोन्याचा साठा 552 टनांपर्यंत वाढला. फेब्रुवारी 2023 मध्ये तुर्कीचा सोन्याचा साठा 587 टन इतक्या विक्रमी उच्चांकावर होता.

चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायना (PBoC) दुसऱ्या स्थानावर आहे. जानेवारी 2024 मध्ये सेंट्रल बँक ऑफ चायना ने 10 टन सोने खरेदी केले होते. चीनचा सोन्याचा साठा जानेवारी 2024 अखेर 2,245 टन होता. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत हा साठा अंदाजे 300 टन अधिक आहे.

RBI's gold purchase highest in almost two years Why are central banks buying gold
RBI Action: रिझर्व्ह बँकेने 2 बँकांना दिला झटका; तुमचे खाते आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारताची केंद्रीय बँक RBI जानेवारी 2024 मध्ये सुमारे 9 टन सोन्याच्या खरेदीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा सोन्याचा साठा आता 812 टन झाला आहे. ऑक्टोबर 2023 नंतर प्रथमच RBI च्या सोन्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. तसेच, जुलै 2022 नंतर RBI च्या सोन्याच्या साठ्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.

कझाकस्तान, जॉर्डन आणि झेक प्रजासत्ताकच्या केंद्रीय बँका जानेवारी 2024 मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर होत्या. कझाकिस्तान, जॉर्डन आणि झेक प्रजासत्ताकच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यात अनुक्रमे 6 टन, 3 टन आणि 2 टन वाढ केली आहे.

बँका सोने का खरेदी करत आहेत?

डॉलरच्या घसरत्या क्रयशक्तीपासून संरक्षण करण्यासाठी सोने हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चलन आणि अर्थव्यवस्था धोक्यात असतानाही मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात.

अमेरिका, चीन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. विशेषत: चीन आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांना तोंड देत आहे. चीनची अर्थव्यवस्था बुडाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.