Virat Kohli: कोहलीच्या 'विराट' चौकार-षटकारांमुळे दारू कंपनी झाली मालामाल; कंपनीच्या नफ्यात विक्रमी वाढ

RCB: देशातील सर्वात मोठी दारू कंपनी युनायटेड स्पिरिट्सच्या निव्वळ नफ्यात क्रिकेटचा वाटा 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात क्रिकेटचा एकूण नफ्यात 16% हिस्सा होता.
RCB
RCB United Spirits Sakal
Updated on

RCB United Spirits Net Profit: देशातील सर्वात मोठी दारू कंपनी युनायटेड स्पिरिट्सच्या निव्वळ नफ्यात क्रिकेटचा वाटा 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की 2023-24 या आर्थिक वर्षात क्रिकेटचा एकूण नफ्यात 16% हिस्सा होता. या काळात क्रिकेट संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या कमाईत दुप्पट वाढ झाली.

आरसीबीचा महसूल 2023-24 मध्ये 163% ने वाढून 650 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी 247 कोटी रुपये होता. या काळात आरसीबीचा निव्वळ नफा 222 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी, कंपनीच्या नफ्यात RCB चा वाटा फक्त 8% होता.

RCB
Bhavish Aggarwal: ईस्ट इंडिया कंपनीसारखी लूट केली जात आहे; भाविश अग्रवाल यांचा विदेशी कंपन्यांवर हल्ला

RCB ला वर्षभरापूर्वी 15 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. USL चे मालक असलेले ज्येष्ठ उद्योगपती विजय मल्ल्या यांनी 2008 मध्ये RCB 111.6 दशलक्ष डॉलरला विकत घेतली. त्यांनी RCB ला USL ची उपकंपनी बनवली.

गेल्या वर्षी, कंपनीने महिला क्रिकेट संघ देखील यामध्ये जोडला आहे. विजय मल्ल्या यांच्यावर बँकांशी फसवणूक केल्याचा आरोप असून ते सध्या ब्रिटनमध्ये राहत आहे. USL ने 2023-24 साठी 25,724 कोटी रुपयांची विक्री आणि 1,312 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 7% घट झाली परंतु नफा 25% ने वाढला.

तज्ञांचे म्हणणे आहे की नफ्याच्या बाबतीत RCB आता USL च्या मालकीच्या 63 मद्य ब्रँड पेक्षा मोठी असू शकते. आयपीएल फ्रँचायझीच्या मालक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष आता गुंतवणुकीवरील परताव्यावर अधिक केंद्रित होण्याची शक्यता आहे. कारण स्पर्धा आता अधिक परिपक्व आणि स्थिर टप्प्यात प्रवेश करत आहे.

RCB
ITR Filing: तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

अँटिक ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत कुंडू यांनी सांगितले की, यूएसएलसाठी, आरसीबी आता नफा तसेच दारू व्यवसायासाठी ब्रँडिंग आणि मार्केटिंगच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. रॉयल चॅलेंज व्हिस्की पूर्वी मागे पडली होती, परंतु कंपनीने ब्रँडमध्ये सुधारणा केली आहे आणि याचे श्रेय आरसीबीला दिले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.