Real Estate Index: रिअल इस्टेट निर्देशांक 10 वर्षांच्या उच्चांकावर; घरांच्या मागणीत मोठी वाढ, काय आहे कारण?

Real Estate Index: रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड वाढ होत आहे आणि त्यामुळे करंट सेंटिमेंट इंडेक्स स्कोअर एका दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. निर्देशांक 72 च्या पातळीवर पोहोचला आहे, जो गेल्या तिमाहीत 69 होता.
Real estate sector booming, Sentiment Index Score at a decadal high
Real estate sector booming, Sentiment Index Score at a decadal highSakal
Updated on

Real Estate Index: रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड वाढ होत आहे आणि त्यामुळे करंट सेंटिमेंट इंडेक्स स्कोअर एका दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. निर्देशांक 72 च्या पातळीवर पोहोचला आहे, जो गेल्या तिमाहीत 69 होता. सेंटिमेंट इंडेक्स स्कोअरमध्ये झालेली वाढ भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असल्याचे दर्शवते.

जेव्हा सेंटिमेंट इंडेक्स स्कोअर 50 च्या वर असतो तेव्हा असे मानले जाते की रिअल इस्टेट क्षेत्र वाढत आहे. आणि जेव्हा स्कोअर 50 च्या खाली असतो तेव्हा रिअल इस्टेट क्षेत्रात घसरण असल्याचे मानले जाते.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्या सहकार्याने नाइट फ्रँकने सुरू केलेल्या निर्देशांकात, जानेवारी-मार्चमध्ये सर्वेक्षण केलेल्या 73 टक्के लोकांचा असा विश्वास होता की येत्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत वाढ होईल.

गेल्या तिमाहीत हा आकडा 65 टक्के होता पहिल्या तिमाहीत, 80 टक्के लोकांचा असा विश्वास होता की येत्या सहा महिन्यांत गृहनिर्माण प्रकल्पांच्या लॉन्चमध्ये वाढ होऊ शकते.

जानेवारी ते मार्च या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात 82 टक्के लोकांच्या मते पुढील सहा महिन्यांत घरांच्या किमती वाढू शकतात. मागील तिमाहीत हा आकडा 65 टक्के होता.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, करंट सेंटिमेंट इंडेक्स स्कोअरमध्ये झालेली वाढ भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असल्याचे दर्शवते.

चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था 8.4 टक्के दराने वाढली. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या मागणीला पाठिंबा मिळत आहे आणि हे क्षेत्र लोकांना गुंतवणुकीच्या योग्य संधी उपलब्ध करून देत आहे.

Real estate sector booming, Sentiment Index Score at a decadal high
Cotton Prices: चांगला मान्सूनचा अंदाज असूनही कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत का आहे? कापड उद्योगावर काय परिणाम होणार?

कार्यालयीन जागेची मागणी वाढली

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्या सहकार्याने जानेवारी-मार्च दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात नाइट फ्रँकने सांगितले की, 74 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की पुढील सहा महिन्यांत कार्यालयीन जागेची मागणी वाढू शकते.

मागील तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान 69 टक्के होती, 58 टक्के लोकांचा असा विश्वास होता की पुढील सहा महिन्यांत कार्यालयीन जागेचा पुरवठा वाढेल.

Real estate sector booming, Sentiment Index Score at a decadal high
EPFO Update: ईपीएफओने केला मोठा बदल; आता नॉमिनीला आधार कार्ड शिवाय काढता येणार पैसे

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत हा आकडा 62 टक्के होता, जानेवारी ते मार्च या कालावधीत 65 टक्के लोकांचा असा विश्वास होता की पुढील सहा महिन्यांत कार्यालयाचे भाडे वाढू शकते, मागील तिमाहीत हा आकडा 53 टक्के होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.