Realty Race: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत टाटा आणि अंबानी यांच्यात 'स्पेस वॉर' सुरु; नेमकं काय आहे प्रकरण?

Realty Race: टाटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतातील दोन सर्वात मोठे समूह मुंबईतील प्रीमियम रिटेल इस्टेटमध्ये जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Zara आणि Starbucks पासून Westside आणि Titan पर्यंत, Tata Group ने भारतात जवळपास 25 दशलक्ष चौरस फूट जागा मिळवली आहे.
Realty race between Tata and Ambani in the financial capital mumbai know details
Realty race between Tata and Ambani in the financial capital mumbai know details Sakal
Updated on

Realty Race: टाटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतातील दोन सर्वात मोठे समूह मुंबईतील प्रीमियम रिटेल इस्टेटमध्ये जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Zara आणि Starbucks पासून Westside आणि Titan पर्यंत, Tata Group ने भारतात जवळपास 25 दशलक्ष चौरस फूट जागा मिळवली आहे.

तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडे 100 हून अधिक स्थानिक आणि जागतिक ब्रँडसाठी 73 दशलक्ष चौरस फूट जागा आहे. टाटा समूहाच्या तुलनेत हे जवळपास तिप्पट आहे. मात्र मुंबईत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. (Realty race between Tata and Ambani in the financial capital mumbai know details)

या दोन समूहांपैकी प्रत्येकाकडे देशाच्या आर्थिक राजधानीत सुमारे 30 लाख चौरस फूट किरकोळ जागा आहे. मुंबईतील रिटेल स्थावर मालमत्ता ही देशातील सर्वात महागडी मानली जाते आणि दोन्ही समूहांना मुंबईत जास्तीत जास्त किरकोळ जागा मिळवायची आहे.

स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग फर्म थर्ड आयसाइटचे संस्थापक देवांशु दत्ता म्हणाले की, टाटा समूह दीर्घकाळ रिटेलमध्ये आहे परंतु रिलायन्सच्या तुलनेत त्याची गती कमी आहे. रिलायन्स आक्रमकपणे रिटेलमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे.

मुंबईत मागणी खूप जास्त असून पुरवठा त्या तुलनेत कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईतील मॉल मालकांसमोर रिटेल ब्रँडला जागा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे.

Realty race between Tata and Ambani in the financial capital mumbai know details
Market Cap: एक अमेरिकन कंपनी सेन्सेक्सपेक्षा मोठी; गुगल आणि फेसबुकलाही टाकले मागे, 'इतके' आहे मार्केट कॅप

भारताचे आर्थिक शक्तीस्थान म्हणून मुंबईने नेहमीच देशभरातील लोकांना आकर्षित केले आहे. जसजसा व्यवसाय वाढत आहे तशी व्यावसायिक मालमत्तेची मागणी वाढत आहे.

टाटा समूहाने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात या क्षेत्रात प्रवेश केला, सुरुवातीला टायटन वॉच स्टोअर्स उघडून आणि एका दशकानंतर वेस्टसाइड डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केली. आतापर्यंत, तनिष्क, स्टारबक्स, झुडिओ, झारा आणि क्रोमा यांसारख्या ब्रँडसह त्याची सुमारे 4,600 स्टोअर्स आहेत.

Realty race between Tata and Ambani in the financial capital mumbai know details
Hanooman AI: AIच्या जगात अंबानींच्या 'हनुमान'ची होणार एन्ट्री; काय आहे या अफाट चॅटबॉटची ताकत?

रिलायन्स रिटेलची सुरुवात 2006 मध्ये झाली. कंपनीने सर्व फॉरमॅटमध्ये आक्रमकपणे स्टोअर उघडून उशीरा प्रवेश करुनही भरपाई केली. रिलायन्सची सुपरमार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, दागिने आणि पोशाख क्षेत्रामध्ये 18,774 हून अधिक स्टोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.