Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत मात्र सोने खरेदीत तेजीत! असं का घडतंय?

Gold Investment: अमेरिका आणि चीनची अर्थव्यवस्था मंदीत असताना सोन्याच्या बाजारात खरेदीचा वेग वाढला आहे.
recession in america and china economy why buying gold is becoming a good Investment
recession in america and china economy why buying gold is becoming a good Investment Sakal
Updated on

Gold Investment: जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे. एकीकडे चीनमध्ये बेरोजगारी आणि महागाई इतकी वाढली आहे की चीन सरकारने बेरोजगारीचे आकडे देणे बंद केले आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील लोकही त्यांच्या देशातील महागाई आणि नोकऱ्या गमावल्यामुळे चिंतेत आहेत.

या सगळ्यात सोन्याच्या बाजारात खरेदीचा वेग वाढला आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या काळात अधिकाधिक लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

मात्र, 2023 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेची ढासळलेली अर्थव्यवस्था पाहता 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात होती.

परंतु वॉल स्ट्रीटच्या बहुतांश बँकांनी आता मंदीचे त्यांचे अंदाज कमी केले आहेत आणि आता असे मानले जात आहे की तिथल्या अर्थव्यवस्थेला फारसा फटका बसणार नाही.

सोन्याची खरेदी का होत आहे?

2007/2008 मध्ये डॉलरने तळ गाठल्यापासून अमेरिकन डॉलर अस्थिर आहे, परंतु गेल्या काही महिन्यांत जागतिक बाजारपेठेत डॉलरचे मूल्य लक्षणीय घटले आहे.

जागतिक COMEX बाजारात सोने प्रति औंस 1,900 डॉलर वरून 0.3 टक्क्यांनी वाढून 1,902.63 डॉलरवर पोहोचले. सोन्याचा भाव गेल्या पाच महिन्यांतील उच्चांकावर आहे. हेच अमेरिकन सोने 0.3 टक्क्यांनी महाग होऊन 1,931.70 डॉलर वर पोहोचले आहे.

recession in america and china economy why buying gold is becoming a good Investment
UPI Lite: आता इंटरनेटशिवाय करता येणार इतक्या रुपयांपर्यंत पेमेंट, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

सोने आणि डॉलर ही दोन्ही सर्वात सुरक्षित मालमत्ता मानली जाते. पण सोने आणि डॉलर या दोन्हींचा एकमेकांशी विपरित संबंध आहे. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, जेव्हा जेव्हा डॉलरचे मूल्य कमी होते तेव्हा सोन्याची मागणी वाढते आणि सोन्याची किंमतही वाढते.

सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा डॉलरचे अवमूल्यन होते तेव्हा गुंतवणूकदार त्यांचे पैसे इतर सुरक्षित ठिकाणी गुंतवतात आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबतीत सोने हा चांगला पर्याय आहे.

recession in america and china economy why buying gold is becoming a good Investment
Bank Fraud Case: आणखी एक बँक घोटाळा, 1,964 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने दाखल केला गुन्हा

सोन्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?

सध्या बाजारात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही दीर्घ कालावधीसाठी सोने खरेदी केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा करता येईल.

जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथे गुंतवणूक केल्याने त्यांना अनेक प्रकारे फायदेही मिळतात.

सोने खरेदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात गुंतवलेले गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात. भविष्यात गरज पडल्यास त्यावर कर्जही घेऊ शकता. गेल्या पाच वर्षांत सोने 31,000 रुपयांवरून 61,000 रुपयांवर पोहोचले आहे. याचा अर्थ सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट परतावा दिला आहे.

recession in america and china economy why buying gold is becoming a good Investment
Income Tax Refund: ITR भरल्यानंतरही 31 लाख लोकांना मिळणार नाही इन्कम टॅक्स रिफंड, काय आहे कारण?

अधिकाधिक लोक सोने का खरेदी करत आहेत?

सोने ही जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आहे आणि याद्वारे कोणतीही व्यक्ती जगातील कोणत्याही देशात खरेदी करू शकते. याशिवाय सोन्यामधील गुंतवणुकीचा इतिहास पाहिला तर त्याने उत्कृष्ट परतावा दिला आहे. सोन्याचा भाव नेहमीच वाढत असतो.

अमेरिका आणि चीन सारख्या देशांमध्ये, जिथे महागाई शिगेला पोहोचली आहे, अशा परिस्थितीत, बहुतेक लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत कारण ते वाढत्या महागाईपासून संरक्षण करते. महागाई वाढली की सोन्याच्या किंमती वाढतात.

याशिवाय सोन्यात गुंतवणुकीसाठी फार पैसे लागत नाहीत. कमी पैशातही तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. जसे की सॉव्हरन गोल्ड बाँड, प्रत्यक्ष दागिन्यांची खरेदी, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF), म्युच्युअल फंड्स यामध्ये गुंतवणूक करु शकता.

विमा म्हणून कार्य

संकटाच्या वेळी सोने विमा म्हणूनही काम करते. कोरोना काळात, बहुतेक देशांची अर्थव्यवस्था खराब होती, त्यावेळी अनेकांना सोन्याचा आधार होता. याशिवाय जर तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही स्वस्त व्याजावर त्वरित सोने कर्ज घेऊ शकता. हे कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.