RIL AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी सांगितले की, कंपनीने गेल्या 10 वर्षांत 150 बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. भारतातील इतर कोणत्याही कंपनीने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा हा आकडा अधिक असल्याचे ते म्हणाले.
रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणाचा संदर्भ दिला. यासोबतच त्यांनी चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला.
RIL च्या बोर्डाने ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्याचवेळी नीता अंबानी यांनी बोर्डाचा राजीनामा दिला आहे. त्या यापुढेही रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राहतील.
मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Jio 5G आणण्यास सुरुवात केली. अवघ्या 9 महिन्यांत Jio 5G जवळपास 96 टक्के शहरांपर्यंत पोहोचले आहे. ते म्हणाले की कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 5G सेवांचा रोलआउट पूर्ण करेल.
मुकेश अंबानी एजीएममध्ये म्हणाले की, Jio 5G मध्ये अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात पूर्णपणे परिवर्तन करण्याची क्षमता आहे. ते म्हणाले की Jio 5G कृषी, आरोग्यसेवा, एमएसएमई क्षेत्रात मोठा बदल घडवून आणू शकतो.
Jio AirFiber 19 सप्टेंबरला लाँच होणार आहे
अंबानी यांनी सांगितले की, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कंपनी Jio Air Fiber लाँच करणार आहे. बरेच दिवस लोक याची वाट पाहत होते.
रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, जिओ फायबर सर्व्हिसेसच्या माध्यमातून कंपनी एक कोटीहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. Jio Air fiber द्वारे, कंपनी 200 दशलक्षाहून अधिक घरांमध्ये आपली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण
रिलायन्स एजीएममध्ये मोठ्या घोषणांदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL शेअर) च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. रिलायन्सचा शेअर 0.25 टक्क्यांनी किरकोळ घसरून 2,463 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.