Reliance SBI Card: रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च, ग्राहकांना मिळणार जबरदस्त ऑफर्स

Reliance SBI Card: रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांच्यात भागीदारी
Reliance and SBI Card launch a credit card with a lifestyle concept
Reliance and SBI Card launch a credit card with a lifestyle concept Sakal
Updated on

Reliance SBI Card: एसबीआय कार्डने मंगळवारी रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने रिलायन्स एसबीआय कार्ड लॉन्च केले. या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डद्वारे, ग्राहक विविध रिलायन्स रिटेल आउटलेटमधून खरेदी करुन ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

रिलायन्स एसबीआय कार्डमध्ये काय आहे खास?

हे कार्ड दोन प्रकारांमध्ये येते, त्यात रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम समाविष्ट आहे. यामध्ये फॅशन आणि लाइफस्टाइलपासून ते किराणा सामान, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ते फार्मा, फर्निचर ते दागिने आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

दोन्ही कार्डचे शुल्क काय आहेत?

  • रिलायन्स SBI कार्ड PRIME 2999 रुपये + कर

  • रिलायन्स एसबीआय कार्ड 499 रुपये + कर

कार्डधारकाने एका वर्षात रिलायन्स एसबीआय कार्ड PRIME वर 3 लाख रुपयांची एकूण खर्च मर्यादा गाठल्यास कार्डचे नूतनीकरण शुल्क माफ केले जाऊ शकते. रिलायन्स एसबीआय कार्डसाठी ही मर्यादा एका वर्षात 1 लाख रुपये आहे.

Reliance and SBI Card launch a credit card with a lifestyle concept
Share Market: 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज

एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अभिजीत चक्रवर्ती म्हणाले, “आम्हाला रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करताना आनंद होत आहे.''

रिलायन्स एसबीआय कार्डच्या लाँचच्या प्रसंगी, रिलायन्स रिटेलचे संचालक व्ही सुब्रमण्यम म्हणाले की, रिलायन्स रिटेलमध्ये आम्ही ग्राहकांना त्यांचा खरेदीचा अनुभव अधिक चांगला कसा बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत. SBI सह आमचे हे को-ब्रँडेड कार्ड या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

Reliance and SBI Card launch a credit card with a lifestyle concept
2,000 रुपयांची नोट बदलण्यासाठी 400 रुपयांचे कमिशन; RBIच्या कार्यालया बाहेर ब्रोकर मालामाल

काय आहेत फायदे?

सर्व पेट्रोल पंपांवर सवलत मिळेल. पेट्रोल पंपावरील खर्च 500 ते 4000 रुपयांच्या दरम्यान असावा (यात जीएसटी आणि इतर शुल्क समाविष्ट नसतील). तुम्ही बुक माय शोवर दर महिन्याला एका चित्रपटाचे तिकीट (रु. 250 पर्यंत) मिळवू शकता.

रिलायन्स रिटेल ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी आहे आणि रिलायन्स उद्योग समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या कंपनीच्या संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.