Mukesh Ambani's Reliance Industries: रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. हा सौदा 27 कोटी रुपयांना झाला आहे. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.
रावळगाव शुगर फार्म यांनी शुक्रवारी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी 1933 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. 1942 मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीचे पान पासंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक असे नऊ ब्रँड आहेत. (Reliance Consumer to acquire Ravalgaon Sugar confectionery brands in Rs 27 cr deal)
सुरुवातीला ही कंपनी साखरेचे काम सांभाळायची. 1940 पासून मिठाई व्यवसायात उतरली. या कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 50% विक्री महाराष्ट्रातून होते. ही कंपनी अनेक दशकांपासून विविध उत्पादने तयार करत आहे.
अलिकडच्या वर्षांत कंपनीला व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. या उद्योगातील वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी झाला आहे.
साखरेच्या किंमतीत झालेली वाढ आणि ऊर्जेचा आणि मजुरीचा जास्त खर्च यामुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे. कोविड आणि लॉकडाऊनमुळे शाळा आणि कार्यालये बंद झाली आणि कंपनीची विक्री या काळात कमी झाली. (Reliance Consumer Acquires Ravalgaon Sugar Confectionery Brands)
एफएमसीजी कंपन्यांमध्ये बाजारपेठेतील जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्याची स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतर कंपन्यांचे अधिग्रहण करत आहेत. मात्र, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या डीलबाबत कोणतेही स्टेटमेंट जाहीर केले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.