Reliance Disney Deal: अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील मोठी कंपनी वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी भारतातील त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सच्या विलीनीकरणासाठी करार केला आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. वॉल्ट डिस्नेने जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातील तीव्र स्पर्धेदरम्यान हा निर्णय घेतला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखालील रिलायन्सचे मीडिया युनिट आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांकडे विलीन झालेल्या संस्थेमध्ये किमान 61 टक्के हिस्सा असणे अपेक्षित आहे. उर्वरित भागभांडवल वॉल्ट डिस्नेकडे राहील. (Jio and Disney signed merger deal reports Ambani can buy this Tata company)
म्हणजेच विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नवीन कंपनीचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्याकडे असतील. सध्या या डीलची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, करार अंतिम होईपर्यंत डिस्नेच्या इतर स्थानिक मालमत्तांचा समावेश कसा केला जातो त्यानुसार दोन कंपन्यांमधील स्टेक स्प्लिट बदलू शकतो. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची सॅटेलाइट टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर टाटा प्लेमध्ये 50.2 टक्के आणि वॉल्ट डिस्नेची 29.8 टक्के हिस्सेदारी आहे.
उर्वरित भागभांडवल सिंगापूर फंड टेमासेककडे आहे. टाटा प्लेवरील चर्चा यशस्वी झाल्यास, टाटा समूह आणि अंबानी पहिल्यांदाच एका उपक्रमात संयुक्त भागीदार होतील आणि टाटा प्ले प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा विस्तार केला जाईल.
डिस्नेचे ग्राहक टिकवून ठेवणे हे कंपनी समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. तर रिलायन्सने अलिकडच्या काही वर्षांत स्थानिक मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाचा मोठा वाटा काबीज केला आहे. 2023 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेचे स्ट्रीमिंग अधिकार जिंकण्यासाठी अंबानींच्या मीडिया कंपनीने डिस्नेला मागे टाकले होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला हा करार जाहीर होण्याची शक्यता आहे. डिस्नेच्या प्रतिनिधीने टिप्पणी करण्यास नकार दिला. करारावर स्वाक्षरी करण्याबाबतच्या प्रश्नाला रिलायन्सच्या प्रवक्त्याने उत्तर दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.