Proposal for Merger : ‘रिलायन्स’ला ‘सीसीआय’ मंजुरीची अपेक्षा;वायकॉम १८ आणि स्टार इंडिया विलीनीकरणासाठी प्रस्ताव सादर

रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘वायकॉम १८’ आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लि.च्या ८.५ अब्ज डॉलरच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्याची मागणी व्यापार नियामक स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) केली आहे.
Proposal for Merger
Proposal for Mergersakal
Updated on

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘वायकॉम १८’ आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लि.च्या ८.५ अब्ज डॉलरच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्याची मागणी व्यापार नियामक स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लि. समूहाचा भाग असलेल्या ‘वायकॉम १८’चा मनोरंजन व्यवसाय आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या स्टार इंडिया प्रा. लि. यांच्या विलीनीकरणातून मनोरंजन क्षेत्रातील एक भव्य कंपनी उभी राहणार आहे.

या प्रस्तावित व्यवहारामुळे भारतातील या क्षेत्रातील स्पर्धेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे रिलायन्स इंडस्ट्रिज लि.ने नोटीसमध्ये नमूद केल्याचे ‘सीसीआय’ने म्हटले आहे. ‘सीसीआय’कडून करण्यात येणारे मूल्यांकन सुलभ करण्यासाठी, रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑडिओ व्हिज्युअल साहित्यासाठी अधिकारांचा परवाना, टीव्ही चॅनेलचे वितरण, ऑडिओ व्हिज्युअल तरतूद आणि जाहिरातींच्या जागेचा पुरवठा आदी अनेक प्रमुख बाजारपेठांची माहिती दिली आहे.

अमेरिकेतील द वॉल्ट डिस्ने कंपनीच्या संपूर्ण मालकीची कंपनी असलेली स्टार इंडिया टीव्ही प्रसारण, मोशन पिक्चर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या व्यवसायासह प्रसार माध्यमांमधील घडामोडींमध्ये सक्रिय आहे, तर वायकॉम १८ भारतात आणि जगभरात दूरचित्रवाणी (टीव्ही) चॅनेलचे प्रसारण, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात गुंतलेली असून, चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या व्यवसायातदेखील ती गुंतलेली आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, जागतिक माध्यम क्षेत्रातील दिग्गज द वॉल्ट डिस्ने कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी त्यांचे भारतातील मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय विलीन करण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या बंधनकारक करारांवर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती. हा करार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, अनेक भाषांमधील १०० हून अधिक चॅनेल, दोन आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि देशभरातील७५ कोटी प्रेक्षकसंख्येसह, भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी तयार होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर उदय शंकर उपाध्यक्ष असतील.रिलायन्स आणि त्याच्या संलग्न कंपन्यांकडे या कंपनीतील ६३.१६ टक्के हिस्सा असेल, तर डिस्नेकडे उर्वरित ३६.८४ टक्के हिस्सा असेल. रिलायन्सने ओटीटी व्यवसाय वाढवण्यासाठी संयुक्त उपक्रमामध्ये सुमारे ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचेही मान्य केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com