Mukesh Ambani: मुकेश अंबानींचा मेगा प्लॅन! नवी मुंबईत घेतली 3,750 एकर जमीन; इतक्या हजार कोटींची झाली डील

Reliance Industries: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) मंगळवारी सांगितले की त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी महाराष्ट्रात जागतिक आर्थिक केंद्र तयार करण्यासाठी 3,750 एकर जमिनीच्या भाडे कराराची नोंदणी पूर्ण केली आहे.
Reliance Industries
Reliance IndustriesSakal
Updated on

Reliance Industries: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) मंगळवारी सांगितले की त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी महाराष्ट्रात जागतिक आर्थिक केंद्र तयार करण्यासाठी 3,750 एकर जमिनीच्या भाडे कराराची नोंदणी पूर्ण केली आहे.

"आरआयएलच्या संपूर्ण मालकीच्या कंपन्यांनी 13,400 कोटी रुपयांना नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडकडून 43 वर्षांसाठी सुमारे 3,750 एकर जमिनीच्या भाडे कराराची नोंदणी पूर्ण केली आहे," असे बीएसईला पाठवलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे. सिडकोची नवी मुंबई IIA प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 26 टक्के हिस्सेदारी आहे.

रिलायन्सने म्हटले आहे की, महाराष्ट्र औद्योगिक धोरण, 2013 नुसार, भाडेपट्टीवर दिलेली ही जमीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी वापरली जाणार आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारसोबत ग्लोबल इकॉनॉमिक हब तयार करण्यासाठी करार करण्यात आला. या हबमध्ये जागतिक भागीदारीसह जागतिक दर्जाच्या डिजिटल आणि सेवा उद्योग क्षेत्राचा समावेश असेल.

Reliance Industries
Stock Market Crash: 'या' 4 कारणांमुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला शेअर बाजार; कोरोना काळातील आठवणीला उजाळा

2018 मध्ये आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र इव्हेंटमध्ये, अंबानी म्हणाले होते, 'आरआयएल महाराष्ट्रात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी भारतातील पहिले औद्योगिक क्षेत्र स्थापन करेल आणि जागतिक कंपन्यांच्या सहभागाने पुढील 10 वर्षांत 60,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाईल''

Reliance Industries
Tata Group: टाटा समूहाच्या 'या' दोन कंपन्या होणार विलीन; गुंतवणूकदारांवर होणार मोठा परिणाम

एका वर्षानंतर, 2019 मध्ये, RIL ने, तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांद्वारे, नवी मुंबई SEZ (NMSEZ) सोबत सुमारे 4,000 एकर जमिनीच्या भाडे तत्त्वाचा करार केला होता.

आरआयएलने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील हजीरा, जामनगर आणि दहेज येथे मोठे औद्योगिक संकुल उभारण्याची त्यांची योजना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com