Vibrant Gujrat Global Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधी नगर येथे 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट चे उद्घाटन केले. यावेळी या समिटची थीम 'गेटवे टू द फ्युचर' आहे. यामध्ये राज्यातील भविष्यातील गुंतवणूक आणि भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे.
मोठे उद्योजक सहभागी
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये देशातील मोठे उद्योगपती सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये अदानी ग्रुपचे गौतम अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला, सुझुकी मोटर कॉर्पचे तोशिहिरो सुझुकी, वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल, आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी मित्तल, उदय कोटक यांसारख्या मोठ्या उद्योगपतींचा समावेश आहे.
यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की,'मोदी है तो मुमकिन है'. गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. गुजरात हे माझे कामाचे ठिकाण आणि माझ्यासाठी मातृभूमी आहे.
एआय गुजरातच्या प्रत्येक क्षेत्राची क्षमता वाढवेल
अंबानी म्हणाले की, रिलायन्स नेहमीच गुजराती कंपनी राहील. गुजरात हा हरित उत्पादनांचा मोठा निर्यातदार देश असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रांतीच्या माध्यमातून गुजरातची क्षमता वाढणार आहे. एआय गुजरातच्या प्रत्येक क्षेत्राची क्षमता वाढवेल.
रिलायन्स रिटेलचा फायदा शेतकरी आणि व्यावसायिकांना होतो
मुकेश अंबानी म्हणाले की, मला गुजराती असल्याचा अभिमान आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा जग ऐकते. RIL ही गुजराती कंपनी होती आणि भविष्यातही गुजराती कंपनी राहील. रिलायन्स रिटेलचा फायदा शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत भारत 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. रिलायन्स इंडस्ट्रीज हाजीरा येथे कार्बन फायबर युनिट उभारणार आहे. रिलायन्स रिटेल लाखो शेतकऱ्यांना सक्षम करेल.
2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचे लक्ष्य पूर्ण करेल. धीरूभाई अंबानी ग्रीन कॉम्प्लेक्स 2024 च्या उत्तरार्धात जामनगरमध्ये सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.