Isha Ambani: मुकेश अंबानींची लेक ईशाच्या कंपनीवर कर्जाचा डोंगर, काय आहे कारण?

Isha Ambani: कंपनीच्या कर्जाने गेल्या आर्थिक वर्षात नवा उच्चांक गाठला आहे.
Isha Ambani
Isha AmbaniSakal
Updated on

Isha Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे. आता त्यांच्या मुलांचीही देशातील सर्वात मौल्यवान कंपनीत महत्त्वाची भूमिका आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज किरकोळ व्यवसायात आक्रमकपणे आपला व्यवसाय वाढवत आहे. हा व्यवसाय रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या नावाने चालवला जात आहे, ज्याचे नेतृत्व ईशा अंबानी करत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात, रिलायन्स रिटेलने आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला आणि त्याला वित्तपुरवठा करण्यासाठी कर्जे उभारली. एका अहवालानुसार, व्यवसाय विस्ताराच्या आक्रमक भूमिकेमुळे, ईशा अंबानीच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या एकूण कर्जाने गेल्या आर्थिक वर्षात नवा उच्चांक गाठला आहे.

कंपनीवर किती कर्ज आहे?

रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या अलीकडील वार्षिक अहवालानुसार, कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात बँकांकडून 32,303 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

रिलायन्स रिटेल लिमिटेडनेही होल्डिंग कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून दीर्घकालीन कर्ज म्हणून रु. 13,304 कोटी घेतले आहेत. सध्या रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​एकूण कर्ज 70,943 कोटी रुपये झाले आहे.

Isha Ambani
Multibagger Stock: रॉकेटच्या वेगाने धावतोय 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे 3 वर्षात 1 लाखाचे झाले 45 लाख

हा आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 73 टक्के जास्त आहे. कंपनीने कर्जाचा उपयोग मुख्यत्वे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केला आहे, ज्यामध्ये स्टोअर-आउटलेट उघडणे आणि नवीन ब्रँड्स घेणे यांचा समावेश आहे.

गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेल लिमिटेडने 3,300 हून अधिक नवीन आउटलेट उघडले. अशाप्रकारे, मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या एकूण आउटलेटची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे.

Isha Ambani
Demat Account: गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे, ऑगस्ट महिन्यात इतक्या नव्या डी-मॅट खात्यांची झाली नोंद

इकॉनॉमिक टाईम्सच्या अलीकडील अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​नवीन आउटलेट्स उघडण्याची गती यावर्षीही कायम राहण्याची अपेक्षा आहे, कारण कंपनी देशातील छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()