Jiocinema Merger With Disney+ Hotstar: जेव्हा रिलायन्स जिओने OTT प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’ वर IPL मोफत दाखवण्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली होती. पण आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा हा OTT प्लॅटफॉर्म लवकरच बंद होऊ शकतो.
रिलायन्स जिओची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डिस्ने यांच्यातील अधिग्रहण करार आता जवळपास निश्चित झाला आहे. हा करार पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा कधीही केली जाऊ शकते. हा करार पूर्ण झाल्यानंतर डिस्नेच्या स्टार नेटवर्कचा संपूर्ण व्यवसाय मुकेश अंबानींचा असेल. हे लक्षात घेऊन मुकेश अंबानी मोठा निर्णय घेऊ शकतात.