Repo Rate : रेपो दर ‘जैसे थे’ राहाण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण समितीत रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Repo Rate
Repo Ratesakal
Updated on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण समितीत रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली असून, ती आठ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास गुरुवारी व्याजदर आणि अन्य निर्णयांची माहिती देतील.

Repo Rate
Repo Rate: महागाई झाली कमी; RBI रेपोरेट कमी करणार का?

ग्राहक किंमत-आधारित महागाईचे चार टक्क्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे रेपो दर सलग सहाव्यांदा ६.५ टक्क्यांवर कायम राहील. या आधी आठ फेब्रुवारी २०२३ रोजी रेपो दरात २५ आधारभूत अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ करण्यात आली होती आणि तो ६.५ टक्के केला होता.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने मुख्य व्याजदर ५.२५ ते ५.५ टक्के असे अपरिवर्तित ठेवले असून, मार्चपासून दरकपात करण्यास सुरुवात करेल असा अंदाज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकही हेच धोरण स्वीकारण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.