Gold Loan : सोने तारण कर्जाच्या रोख रकमेवर मर्यादा; केवळ 'एवढीच' रक्कम मिळणार कॅश.. रिझर्व्ह बँकेचे कठोर आदेश!

RBI on Gold : रिझर्व्ह बँकेने नुकतेच ‘आयआयएफएल फायनान्स’ला अनेक गैरपद्धतींचा वापर केल्याबद्दल सोने तारण कर्ज मंजूर करण्यास किंवा वितरित करण्यास मनाई केली आहे.
Gold Loan Cash
Gold Loan CasheSakal
Updated on

Gold Loan Cash Limit : भारतीय रिझर्व्ह बँकेने बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) सोने तारण कर्ज घेणाऱ्यांना जास्तीत जास्त २० हजार रुपये रोख स्वरूपात द्यावेत, त्यापेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

प्राप्तिकर कायद्यानुसार दिलेल्या या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचीही सूचनाही आरबीआयने दिली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोने तारण कर्ज क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि बचतगट संस्थांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीमध्ये, रिझर्व्ह बँकेने प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम २६९ एसएस’चे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली होती.

या कलमानुसार, एखाद्या व्यक्तीला इतरांकडून ठेव किंवा कर्ज म्हणून रोख रकमेच्या रूपात कमाल २० हजार रुपयेच स्वीकारता येण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच ‘आयआयएफएल फायनान्स’ला अनेक गैरपद्धतींचा वापर केल्याबद्दल सोने तारण कर्ज मंजूर करण्यास किंवा वितरित करण्यास मनाई केली आहे.

Gold Loan Cash
Jalgaon Gold Rates Hike : सोने 12 हजार रुपयांनी महाग! विक्रीत दहा टक्के घट; दरवाढीचा परिणाम

सोनेतारण कर्ज व्यवसायातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने केल्या जात असलेल्या कठोर उपाययोजनांचे हे पुढचे पाऊल आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या उपाययोजनांचे वित्तीय संस्थांनीही स्वागत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.