दोन हजारच्या नोटांचे काय

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कायदा, १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजार रुपये मूल्याची नोट सादर करण्यात आली होती. प्रामुख्याने अर्थव्यवस्थेची चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने या नोटा चलनात आणल्या होत्या.
2000 Notes
2000 Notessakal
Updated on

2000 Notes - सरकारने दोन हजार रुपयांची नोट आता चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. ही पुन्हा नोटाबंदी असल्याचा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, हा निर्णय आणि नोटाबंदी यात फरक आहे. सर्वसामान्य जनतेने हवालदिल होण्याची गरज नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत एक मार्गदर्शनपर सविस्तर माहिती दिली आहे. त्याआधारे, नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून का काढल्या जात आहेत?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कायदा, १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजार रुपये मूल्याची नोट सादर करण्यात आली होती. प्रामुख्याने अर्थव्यवस्थेची चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने या नोटा चलनात आणल्या होत्या.

त्या उद्दिष्टाची पूर्तता आणि इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याने २०१८-१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली. दोन हजार रुपयांच्या बहुसंख्य नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या आणि अंदाजे चार ते पाच वर्षांच्या आयुर्मानाच्या आहेत.

वरील बाबी लक्षात घेऊन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोट धोरणाच्या अनुषंगाने, आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2000 Notes
Pune Crime : महर्षीनगरमध्ये दोघांवर कोयत्याने वार

स्वच्छ नोट धोरण म्हणजे काय?

चांगल्या दर्जाच्या नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हे आरबीआयने अवलंबलेले धोरण आहे

दोन हजार रुपयांच्या नोटांची कायदेशीर चलन म्हणून स्थिती कायम आहे का?

होय,दोन हजार रुपयांच्या नोटेची कायदेशीर चलन म्हणून स्थिती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कायम राहील. सर्व नागरिक त्यांच्या व्यवहारांसाठीदोन हजार रुपयांच्या नोटा वापरणे सुरू ठेवू शकतात आणि त्या मोबदला म्हणूनदेखील स्वीकारू शकतात. तथापि, त्यांना ३० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी बँकेत नोटा जमा करणे किंवा बदलणे अपेक्षित आहे.

2000 Notes
Mumbai : चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचे स्पष्ट; 'त्या' प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल!

जनतेने त्यांच्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे काय करावे?

नागरिक त्यांच्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेच्या शाखांमध्ये जमा करू शकतात किंवा बदलण्यासाठी जाऊ शकतात. या नोटा खात्यात जमा करण्याची आणि बदलून घेण्याची सुविधा ३० सप्टेंबर २०२३पर्यंत सर्व बँकांमध्ये उपलब्ध असेल. आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्येदेखील ही सुविधा उपलब्ध असेल.

या नोटा जमा करण्याची किंवा बदलून घेण्यासाठी काही मर्यादा आहे का?

ज्या बॅंकेत तुमचे खाते आहे, तेथे तुम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यावर मर्यादा नाही. परंतु, तुम्ही जमा केलेल्या नोटांची रक्कम तुमच्या प्राप्तिकर विवरणपत्रात तुम्हाला दाखवावी लागेल. अर्थात, ही रक्कम करभरणा करून मिळवलेल्या जाहीर स्रोतांपैकी असणे गरजेचे आहे.

2000 Notes
Pune : महापालिकेच्या डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

त्या व्यतिरिक्तवीस हजार रुपये किंमतीपर्यंतच्या दोन हजार रुपयांच्या नोटा खाते नसलेल्या बॅंकेतूनदेखील बदलून मिळतील. बिझनेस करस्पॉन्डंट्सद्वारे खातेदाराला दररोज चार हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळतील. यासाठी बँकांना पूर्वतयारी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. नागरिकांना २३ मे २०२३पासून बँक शाखा किंवा आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयांशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासाठी काही शुल्क भरावे लागेल का? नाही, ही विनिमय सुविधा विनामूल्य प्रदान केली जाईल. ज्‍येष्‍ठ नागरिक, अपंग व्‍यक्‍ती आदींसाठी विशेष व्‍यवस्‍था असेल का?

2000 Notes
Mumbai : चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचे स्पष्ट; 'त्या' प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल!

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी किंवा जमा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.

बँकेने या नोटा बदलून देण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिल्यास?

अशावेशी ग्राहक प्रथम संबंधित बँकेकडे तक्रार निवारणासाठी संपर्क साधू शकतात. तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत बँकेने प्रतिसाद न दिल्यास किंवा तक्रारदार बँकेच्या निराकरणाने समाधानी नसल्यास, ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार नोंदवू शकतात.

शशांक वाघ (लेखक बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()