निवृत्तीनंतरचा आधार ‘एनपीएस’

‘एनपीएस’ अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक पेन्शन योजना असून, ती सरकारी कर्मचारी; तसेच खासगी कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध
retirement NPS
retirement NPSsakal
Updated on
Summary

‘एनपीएस’ अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक पेन्शन योजना असून, ती सरकारी कर्मचारी; तसेच खासगी कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध

- प्रणव मंत्री

‘एनपीएस’ अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक पेन्शन योजना असून, ती सरकारी कर्मचारी; तसेच खासगी कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध आहे. नियमित मासिक उत्पन्नासह निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेसा निधी तयार करण्यासाठीचा हा सर्वांत लोकप्रिय पर्याय आहे.

‘एनपीएस’मध्ये जमा केलेली रक्कम शेअर बाजारासह अन्य विविध पर्यायांमध्ये गुंतविली जाते. त्यामुळे परतावा चांगला मिळतो. तसेच यावर करवजावटीचाही लाभ घेता येतो. ३१ मार्चपूर्वी यात गुंतवणूक केल्यास याचा लाभ घेता येईल. ‘एनपीएस’मध्ये एनपीएस टिअर-१ आणि एनपीएस टिअर-२ अशी दोन प्रकारची खाती उघडावी लागतात.

टिअर-१ खाते : या खात्यात ६० वर्षे वयापर्यंत कर्मचारी पैसे भरू शकतात. यातील रक्कम काही अटींसह केवळ आंशिक प्रमाणातच काढण्याची परवानगी आहे. या खात्यातील रकमेवर ‘कलम ८० सीसीडी (१)’ आणि ‘कलम ८० सीसीडी (१ बी)’ अंतर्गत त्यावर करवजावट मिळवता येते. ‘कलम ८० सीसीडी (१)’ अंतर्गत १.५० लाख रुपये आणि ‘कलम ८० सीसीडी (१ बी)’ अंतर्गत अतिरिक्त ५० हजार रुपये अशी एकूण दोन लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर करवजावट मिळू शकते.

retirement NPS
Finance Bill 2023 : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, वित्त विधेयकात प्रस्ताव

टिअर-२ खाते : हे एक बचत खाते आहे. यातून ग्राहकांना त्यांना गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. मात्र यातील रक्कम करकपातीस पात्र नाही. टिअर-२ खाते उघडण्यासाठी प्रथम टिअर-१ खाते उघडणे अनिवार्य आहे. या खात्यातून कोणत्याही वेळी, कोणत्याही निर्बंधाशिवाय पैसे काढता येतात.

‘एनपीएस’ चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे का?

‘एनपीएस’ ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. जी सेवानिवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाची आवश्यकता पूर्ण करते. ज्याचा लाभ पैसे काढण्याच्या मर्यादित पर्यायांसह निवृत्तीनंतरच उपलब्ध होईल. गुंतवणूकदाराला निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचे राहणीमान, कमाई व इतर आर्थिक वचनबद्धता लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

काही निवडक प्रश्न

१) दरवर्षी ‘एनपीएस’मध्ये रक्कम जमा करणे अनिवार्य आहे का?

प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा तरी किमान रक्कम जमा करणे आवश्‍यक आहे. न भरल्यास खाते गोठवले जाईल. अशावेळी १०० रुपये दंड भरून खाते सक्रिय करता येते.

२) ‘एनपीएस’कडून किती पेन्शन मिळू शकेल?

पेन्शनची रक्कम आपल्या गुंतवणुकीवर आणि कॉर्पस फंडावर अवलंबून असते.

३) ‘एनपीएस’साठी लॉक-इन कालावधी किती आहे?

ही गुंतवणूक ६० वर्षांपर्यंत लॉक असते. ६० व्या वर्षी जास्तीत जास्त ६० टक्के कॉर्पस परत घेता येतो. उर्वरित ४० टक्के रक्कम ॲन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरणे आवश्यक आहे.

४) खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ‘एनपीएस’चे काय होते?

नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसाला संपूर्ण शिल्लक दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.