RIL Q2 Result: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा निकाल जाहीर, मुकेश अंबानी म्हणाले, प्रत्येक बिझनेसमध्ये नफा

RIL Q2 Result: कंपनीचा वार्षिक नफा 27 टक्क्यांनी वाढून 17,394 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
RIL Q2 Result
RIL Q2 ResultSakal
Updated on

RIL Q2 Result: देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा वार्षिक नफा 27 टक्क्यांनी वाढून 17,394  कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा 13,656 कोटी रुपये होता. तेल आणि गॅस व्यवसायातून उत्पन्नात वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, फॅशन-लाइफस्टाइल रिटेल आणि ई-कॉमर्समध्ये व्यवसाय वाढल्यामुळे महसूल वाढला आहे.

कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, "सर्व व्यवसाय विभागातील कामगिरी आणि आर्थिक योगदानामुळे रिलायन्सची वाढ झाली आहे."

रिलायन्स समूहाचा महसूल सप्टेंबर तिमाहीत 2.34 लाख कोटी रुपये होता, ज्यामध्ये वार्षिक आधारावर केवळ 1 टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचे उत्पन्न 2.32 रुपये होते. तेल ते रसायन व्यवसायात, इंधन आणि पेट्रोकेमिकल मागणी आणि निर्यातीवरील कमी विंडफॉल नफा कर यामुळे महसुलात वाढ झाली.

जिओचा व्यवसायही वाढला

दुसऱ्या तिमाहीत जिओचा निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 5,297 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4,729 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

RIL Q2 Result
SSY: सुकन्या समृद्धी योजनेच्या मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये हवेत, तर दरमहा किती बचत करावी लागेल?

कंपनीने सांगितले की सप्टेंबर तिमाहीत त्यांचे उत्पन्न 10.7 टक्क्यांनी वाढून 26,875 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 24,275 कोटी होते. कंपनीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी रिलायन्स रिटेलवर त्यांचा विश्वास कायम ठेवला आणि या तिमाहीत कंपनीमध्ये 15,314 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला भागधारकांनी मंजुरी दिली आहे.

RIL Q2 Result
Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटी रुपयांची केली मागणी

चेअरमन मुकेश अंबानी यांनी ऑगस्टमध्ये कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा केली होती की त्यांची तीन मुले आकाश, ईशा आणि अनंत यांचा रिलायन्सच्या संचालक मंडळात समावेश केला जाईल. बीएसईवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.78 टक्क्यांच्या वाढीसह 2,266.15 रुपयांवर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.