म्युच्युअल फंड
हितेश दास , फंड व्यवस्थापक, ॲक्सिस म्युच्युअल फंड
या दशकाच्या सुरुवातीला जगाला कोरोना महासाथीचा फटका बसला, नंतर रशिया व युक्रेन युद्ध, इस्त्राईल-हमास युद्ध सुरू झाले. परिणामी, गुंतवणुकीच्या कल्पना, वर्तणूक, धारणा यावर सातत्याने मंथन होत आहे. यातून पुढे आलेली चांगली गोष्ट म्हणजे ‘कन्झम्प्शन’ अर्थात उपभोग. यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.