Rs 100 Nepal Currency Note: नेपाळने शुक्रवारी 100 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची घोषणा केली आहे. नेपाळ आपल्या 100 रुपयांच्या नव्या नोटेवर भारतातील लिपुलेख, लपियाधुरा आणि कालापानीसह नेपाळी नकाशा छापेल. भारताने आधीच या क्षेत्रांना कृत्रिमरित्या विस्तारित म्हटले आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत माहिती देताना नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या आणि माहिती व दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, "नेपाळचा नवा नकाशा 100 रुपयांच्या नोटेमध्ये छापण्याचा निर्णय नेपाळच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.''
रेखा शर्मा शर्मा यांनी सांगितले की, "25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 100 रुपयांच्या नोटेचे डिझाइन आणि बँक नोटेच्या पार्श्वभूमीवर छापलेला जुना नकाशा बदलण्यास मंजुरी दिली आहे." नेपाळच्या या निर्णयावर केंद्र सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी नेपाळने एकतर्फी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपला प्रदेश म्हणून घोषित केला होता.
या तिन्ही क्षेत्रांवर आपला हिस्सा असल्याचा दावा नेपाळ वेळोवेळी करत आहे. यापूर्वी देखील नेपाळच्या माजी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी म्हणाल्या होत्या की, कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत आणि यासंदर्भात भारतासोबत जो काही वाद आहे तो राजनैतिक मार्गाने सोडवला गेला पाहिजे.
कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला हे देखील नेपाळमधील निवडणुकीचे मुद्दे आहेत आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी निवडणुकीदरम्यान वचन दिले होते की जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर ते कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख भाग वाटाघाटीद्वारे परत घेतले जातील.
नेपाळच्या नकाशात कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा आपला प्रदेश म्हणून दाखविल्यानंतर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ही तिन्ही ठिकाणे पारंपारिकपणे भारत-नेपाळ सीमेवर उत्तराखंडमध्ये आहेत.
नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने सुमारे 3 वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या नेपाळच्या नवीन राजकीय नकाशात हे भाग नेपाळचा प्रदेश म्हणून दाखविण्यात आल्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले होते की, स्थानिक जमिनीच्या नोंदीवरून असे दिसून येते की कालापानी आणि लिपुलेखमधील जमीन भारत-नेपाळ सीमेवरील भारताच्या बाजूला असलेल्या दोन गावांतील रहिवाशांच्या मालकीची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.