Letter of Intent : इच्छापत्र का व कसे आवश्यक

अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेले इच्छापत्र अडचणी निर्माण करते. इच्छापत्र योग्य सल्ला व मार्गदर्शन घेऊनच करणे आवश्यक आहे.
Letter of Intent
Letter of Intentsakal
Updated on

- हृषिकेश गोडसे, व्यवसायप्रमुख ‘मेटको’

अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेले इच्छापत्र अडचणी निर्माण करते. इच्छापत्र योग्य सल्ला व मार्गदर्शन घेऊनच करणे आवश्यक आहे. मिळकतीच्या वाटपासाठी योग्य त्या व्यक्तीची, संस्थेची, इच्छापत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमणूक करणे हिताचे असते. इच्छापत्र तयार करण्यासाठी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनाबबत आज पुण्यात ‘मेटको’ने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त...

इच्छापत्र का करावे?

जर इच्छापत्र केले असेल तर वारसांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता कमी असते. हा गोंधळ इच्छापत्र केले आहे का नाही, इथपासून सुरू होतो. कायदेशीर बाबी सांभाळून इच्छापत्र केले असेल तर ते कायदेशीररीत्या वैध ठरते.

इच्छापत्र तयार करण्यासाठी वय किती असावे?

१८ वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय सज्ञान नागरिकास इच्छापत्र तयार करण्याचा कायदेशीर हक्क आहे.

इच्छापत्राद्वारे इतर नातेवाइकांना कशी मदत करता येईल?

इच्छापत्र करून आपण इतर नातेवाइकांना, ज्यांना वारसाहक्काने काही मिळाले नसते, त्यांनासुद्धा काही देऊ शकतो. (उदा. जर एखाद्या व्यक्तीचे संगोपन, शिक्षण कोणा नातेवाइकाने केले असेल आणि त्या नातेवाइकाला वा त्याच्या अपत्यांना जर काही द्यावे, असे इच्छापत्रकाराला वाटत असेल तर ते फक्त इच्छापत्रानेच देऊ शकतात.

इच्छापत्राद्वारे एखाद्या अपत्यास वाटा न देणे शक्य आहे का?

ज्याच्याशी सर्व संबंध तोडलेले आहेत, अशा एखाद्याचे अपत्य आपल्या माता, पित्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीत वाटा मागू शकेल व त्यासाठी कोर्टकचेरीचा त्रास सहन करावा लागेल. हा त्रास टाळण्यासाठी इच्छापत्र करणे हाच मार्ग आहे.

इच्छापत्राद्वारे विशेष अपत्यास जास्त वाटा देऊ शकतो का?

कायद्यासमोर सर्व समान आहेत. समजा कोणा एकाचे अपत्य मानसिक वा शारीरिकदृष्ट्या विकल असेल, तर अशा अपत्याला आपल्या संपत्तीत जास्त हिस्सा द्यावा, असे जर त्याच्या माता-पित्याला वाटले, तर ते योग्यच म्हणावे लागेल. पण हे प्रत्यक्षात होण्यासाठी इच्छापत्र केले नाही तर विकल अपत्याला सुदृढ अपत्याएवढाच हिस्सा मिळेल.

इच्छापत्राद्वारे आपल्या सहायकाला, गरजू नातेवाइकाला विशेष देणगी देता येते का?

ज्याने आपल्या सुख-दुःखात आयुष्यभर साथ दिली, अशा स्नेहीला वा ज्याने आयुष्यभर सेवा केली, अशा नोकराला, सेवकाला वा गरजू नातेवाइकाला; अन्यथा त्या संपत्तीपैकी काहीही मिळाले नसते, अशांना इच्छापत्राने देणगी देता येते.

इच्छापत्र करून कुटुंबातील संभाव्य वाद टाळता येतात का?

इच्छापत्रावरून वाद झाल्याचे आपण ऐकतोच. पण इच्छापत्राने संभाव्य वाद टाळताही येऊ शकतात, हे तितकेच खरे आहे. विशेषतः कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अकाली निधन झाले तर संपतीवरून वाद होण्याची शक्यता असते. यात जो मानसिक त्रास सहन करावा लागतो, तो टाळण्यासाठी इच्छापत्र हाच एक उपाय आहे.

घटस्फोटित जोडीदाराचा-ची संपत्तीत वाटा येऊ नये म्हणून इच्छापत्र करावे का?

घटस्फोटित पती किंवा पत्नीला संपत्तीत हक्क राहू शकतो, हे ध्यानात घेऊन घटस्फोटितांसाठी पश्‍चात आपल्या संपत्तीचा विनियोग इच्छेप्रमाणे व्हावा, यासाठी इच्छापत्र हा एकच मार्ग आहे.

इच्छापत्राद्वारे आयकर वाचवता येतो का?

अकारण व अनपेक्षित पडणारा आयकर वाचण्यासाठी इच्छापत्राच्या माध्यमाचा वापर करता येतो.

इच्छापत्र करायला इतर बाबी काय आहेत?

इच्छापत्र तयार करण्यासाठी एका कागदावर इच्छापत्र लिहून त्यावर दोन साक्षीदारांनी साक्ष व डॉक्टरचे प्रमाणपत्र लागते. इच्छापत्र दस्त नोंदणीकृत करता येऊ शकते.

‘मेटको’ इच्छापत्र तयार करून एक्झिक्युटर होते का?

‘मेटको’ ही भारत सरकारच्या बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेची उपकंपनी आहे. त्यामुळे एका त्रयस्थ सरकारी संस्थेमार्फत अंत्यत अल्पदरात मालमत्तेचे व्यवस्थापन व कायदेशीर वारसास / नामनिर्देशित व्यक्तीस/ संस्थेस इच्छापत्रकर्त्यास त्याने इच्छापत्रात नमूद केल्याप्रमाणे वाटप करता येते, त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात संदेह निर्माण होत नाही.

(संदर्भ - इच्छापत्र का व कसे - अरुण केळकर, मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शन-अरुण गोडबोले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.